भाजप जिल्हाध्यक्षपदी तारिक कुरेशी
By Admin | Updated: January 18, 2016 00:27 IST2016-01-18T00:27:19+5:302016-01-18T00:27:19+5:30
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तारिक कुरेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

भाजप जिल्हाध्यक्षपदी तारिक कुरेशी
भंडारा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तारिक कुरेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपद निवडणुकीसाठी आज रविवारला बैठक घेण्यात आली. या बैठकीत ही निवड करण्यात आली. यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक धोटे व विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर हे निवडणूक अधिकारी म्हणून आले होते.
या बैठकीला खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आमदार रामचंद्र अवसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ.प्रकाश मालगावे, धनंजय मोहरकर, रेखा भाजीपाले, इंद्रायणी कापगते, डॉ. उल्हास बुराडे यांच्यासह आजी माजी अध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनेकांची नावे समोर आली. खासदार पटोले यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी तारिक कुरेशी यांचे नाव सुचविले. त्याला उपस्थितांनी अनुमोदन दिले. ही निवडणूक प्रक्रिया हातवर करुन करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेचे संचालन राजकुमार गजभिये यांनी केले. यावेळी नितीन कढव, भरत खंडाईत, प्रदीप पडोळे, मुकेश थानथराटे, चंद्रशेखर रोकडे, सुनिल मेंढे, सुर्यकांत इलमे, विकास मदनकर, संजय मते, आबीद सिद्दीकी, पद्माकर बावनकर, नूतन कांबळे, राजेश पटले, बाबु ठवकर, विजय जयस्वाल, के. डी. मोटघरे, अरविंद भालाधरे, हरिश तलमले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)