शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना तलाठी जाळ्यात

By admin | Updated: September 22, 2014 23:12 IST

विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहाडी येथील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. रामरतन टिकाराम इलमे असे या अटक

मोहाडीतील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईभंडारा : विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडल्यानंतर त्याला सोडून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहाडी येथील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. रामरतन टिकाराम इलमे असे या अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. मोहाडी येथील तलाठी कार्यालयात तलाठी रामरतन इलमे कार्यरत आहेत. तक्रारकर्ता यांची शेती व विटाभट्टीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे तीन ट्रॅक्टर आहेत. दि. २१ सप्टेंबर २०१४ रोजी ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ एल ७१६ द्वारे महालगाव ते वरठी या मार्गावर विटांची वाहतूक करीत असताना मोहाडी येथील चौकात सदर तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला. याची माहिती ट्रॅक्टरचालक विलास ढबाले यांनी भ्रमणध्वनीहून ट्रॅक्टरमालकाला दिली.तक्रारकर्त्याने भ्रमणध्वनीहून तलाठी इलमे यांना ट्रॅक्टर सोडून देण्याची विनंती केली. ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी इलमे यांनी ३२०० रुपयांची मागणी केली. पैसे देण्याचे मान्य नसल्याने याची तक्रार भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला. दरम्यान आज सोमवारला रामरतन इलमे यांना तडजोडीनंतर तक्रारकर्त्याकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. मोहाडी पोलिसात इलमे यांच्याविरुद्ध कलम ७, १३ (१), (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९७८ अन्वये गुन्हा नोंद करून त्यांच्याकडून दोन हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. सदर कारवाई पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक भातकुले, पर्वते, पोलीस नायक अशोक लुलेकर, राजेश ठाकरे, सचिन हलमारे, गौतम राऊत, भाऊराव वाडीभस्मे, मनोज पंचबुद्धे, अश्विन गोस्वामी, शेखर देशकर, लोकेश वासनिक, टांगले यांनी केली. तपास पोलीस निरीक्षक जीवन भातकुले करीत आहेत. या घटनेमुळे मोहाडी तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)