शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

शासनाच्या योजनांची माहिती घेऊन लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 10:35 PM

सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने माहिती अभियान राबविण्यात येत असून विविध शासकीय विभागाच्या योजनांची जनतेने माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले.

ठळक मुद्देतहसीलदारांचे आवाहन : लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे माहिती अभियान

आॅनलाईन लोकमतभंडारा : सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने माहिती अभियान राबविण्यात येत असून विविध शासकीय विभागाच्या योजनांची जनतेने माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन लाखनीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय भंडारा व तहसिल कार्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी तालुक्यातील मानेगाव (सडक) येथे माहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते होते. प्रमुख अतिथी म्हणून खंडविकास अधिकारी ब्राम्हणकर, तालुका कृषि अधिकारी पदमाकर गिदमारे, नायब तहसिलदार शरद घारगडे, विनोद थोरवे, उपअधिक्षक भूमि अभिलेख नान्हे, वनपरिक्षेत्र अधिकारी कोळी, वैद्यकीय अधिकारी डहारे, मस्के, भास्कर डहारे, मानेगावचे सरपंच नरेंद्र भांडारकर उपस्थित होते.अक्षय पोयाम यांनी जनतेला अपघात तसेच गुन्हाची माहिती या अ‍ॅपद्वारे पोलीसंपर्यंत तात्काळ पोहचविण्यासाठी मदत होते. त्यामुळे पोलीसाद्वारे कारवाई करणे सोईचे होते. ग्रामस्थांनी योजना समजावून घ्याव्यात व त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. रवी गिते यांनी अनेकदा शासकीय योजनांची माहिती लोकांना मिळत नाही. त्यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. लोकांना या शासकीय सर्व योजनांची माहिती त्यांच्या गावातच मिळावी व त्याचा लाभ लोकांना व्हावा हा या अभियानाचा उद्देश आहे. योजनांची माहिती वृत्तपत्र व दूरदर्शनद्वारे जनतेस मिळावी हेच आमच्या विभागाचे काम आहे,यावेळी डहारे यांनी आरोग्य विभागाच्या जननी शिशू योजना, स्तनदा माता, जननी शिशू सुरक्षा योजना मानव विकास सेवा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, कुटूंब नियोजन सिकलसेल, क्षयरोगाबाबत माहिती दिली. कृषि विभागाचे भांडारकर यांनी जिल्हा निधी योजना, राष्टीय बायोगॅस विकास योजना, थेट हस्तांतरण योजना, डॉ. बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना बाबत माहिती दिली. गिदमारे यांनी शेतीचे दोन भाग पडतात एक पारंपारिक व दुसरे आधूनिक शेती आता आधूनिक शेती शिवाय पर्याय नाही. तसेच सोबत जोडधंदा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान, कषि यांत्रिकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सेंद्रिय शेतीबाबत माहिती दिली. ब्राम्हणकर यांनी पंचायत स्तरावरील योजना तसेच ओडीस प्लस, शौचालय योजना, घरकुल योजना, शबरी आवास योजना, मुलींना सायकल वाटप व भाग्यश्री योजनेबद्दल माहिती दिली.यावेळी तहसिल कार्यालयातर्फे कुटूंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत अल्का सारवे, रेखा माने, मोनाली शिंदे, उर्मिला बोदेले यांना प्रत्येकी २० हजाराचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच शिधा पत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.अभियानात आमआदमी विमा योजना शिष्यवृत्ती, संजय गांधी, इंदिरा गांधी , श्रावणबाळ योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, स्पर्श कुष्ठरोग अभियान, तालुका कृषि अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव, तालुका आरोग्य अधिकारी, कुष्ठरोग शोध मोहिम, अनूगामी लोकराज्य अभियान, तहसिल कार्यालय लाखनी, महाराष्ट्र सिटीजन पोर्टल व फिरते पोलीसठाणे, क्षयरोग इत्यादीं विभागाने एकूण १५ स्टॉल लावले होते. यावेळी मोठया संख्येने अधिकारी, कर्मचारी, गावकरी पुरुष व महिला उपस्थित होत्या.