लाखनीः डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ नागपूर तर्फे राज्यस्तरीय अभिनंदन प्रश्नोत्तरी स्पर्धा स्कायवॉर्ड इंटरनॅशनल स्कूल पिंपळगाव /सडक येथे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी गोजिरी तुळशीदास भाजीपाले हिने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय शाळेचे संचालक डॉ. पंकज कटकवार, डॉ. नीरज कटकवार ,डॉ. विलास बुलकुंडे ,डॉ. सोनाली काकडे यांना दिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ह्या यशाबद्दल कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका दया राऊत, प्रशासक गिरीश बावनकुळे, उपमुख्याध्यापिका श्वेता मुंडे, शाळेतील शिक्षक देविदास आकरे, मृणालिनी माटे, जयंत खोब्रागडे, भैरव खेडीकर, गायत्री बावनकर, अश्विनी खोडपे, खेमलता गणवीर, निदा सय्यद यांनी यशाची विद्यार्थ्यांचे कौतुक केले.