शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटांना स्थगिती, मात्र अहोरात्र खनन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:20 IST

जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. उत्खननास बंदी असली तरी रेतीचे खनन मात्र सर्रास सुरू आहे.

ठळक मुद्दे४९ घाट : न्यायालयीन प्रक्रियेत अडकला लिलाव

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जिल्ह्यातील ४९ पैकी १९ रेतीघाटांचा लिलाव झाला. लिलावाचा निधी शासकीय तिजोरीत जमा झाला. २५ ते ३० दिवस रेतीचा उपसाही सुरू केला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी घाटातून रेती खनन व वाहतुकीवर बंदी आणली. उत्खननास बंदी असली तरी रेतीचे खनन मात्र सर्रास सुरू आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगा, चुलबंद, बावनथडी आदी नद्यांवर रेतीघाट आहे. भंडारा जिल्ह्यातील रेतीला विदर्भात मागणी आहे. त्यामुळेच या रेतीवर कंत्राटदारांच्या उड्या पडतात. प्रशासनाने रेतीघाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली होती. ४९ पैकी १९ रेतीघाटांचे लिलाव झाले होते. त्यात लाखनी तालुक्यातील पालांदूर शेजारी वाकल व पाथरी घाट सुमारे तीन कोटी रूपयात गेला होता. उर्वरित घाटांचा लिलाव काही कारणाने झाला नाही. पळसगाव घाट राखीव ठेवण्यात आला. विक्री झालेल्या घाटातून नियमानुसार निश्चित दराने रेतीची उचल सुरू झाली. परंतु न्यायालयीन अडथळ्याने रेती उत्खनन व वाहतुकीला स्थगिती मिळाली. त्यामुळे प्रशासनाने ताबा घेत घाटावर बंदी आणली.मात्र जिल्ह्यातील बहुतांश घाटांवरून रेतीची वाहतूक खुलेआम सुरू आहे. तुमसर, पवनी तालुक्यातील घाटांवरून शेकडो वाहने रेतीची चोरी करीत आहे. हा प्रकार जिल्हा खनिकर्म विभागासह महसूल अधिकाऱ्यांना माहित आहे. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही.भंडारा जिल्ह्यात रेतीतस्कर सध्या धुमाकूळ घालत असून यात अनेकांचा बळी गेला आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा रेतीघाटावर एक विद्यार्थी जेसीबीच्या पंजाने जखमी होऊन मृत्युमुखी पडला. तर महसूलच्या पथकाला न जुमानता वाहने पळवून नेण्याच्या घटनातही वाढ झाल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे.लिलावासाठी कंत्राटदारांची चेनजिल्ह्यातील रेतीघाटांची किंमत कोट्यवधीच्या घरात असते. त्यामुळे एकापेक्षा अधिक कंत्राटदार एकत्र येऊन चेन तयार करतात. आॅनलाईन पद्धतीने सोपस्कार आटपून प्रक्रिया केली जाते. ज्या कंत्राटदारांना घाट मिळाले नाही ते न्यायालयात पोहोचतात. तेथून स्थगिती मिळते मात्र या काळात रेतीची तस्करी जोमात होते.खनन बंदी मात्र बांधकाम सुरूभंडारा जिल्ह्याचे रेतीघाटावर खननाला बंदी असली तरी सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे बांधकाम सुरू आहे. यात शासकीय कामांचाही समावेश आहे. एकीकडे रेतीघाटावर बंदी असताना दुसरीकडे रेती उपलब्ध कशी होते, हा संशोधनाचा विषय आहे.