अभ्यासकेंद्र ज्ञान गंगेचे माध्यम

By Admin | Updated: July 17, 2014 23:55 IST2014-07-17T23:55:41+5:302014-07-17T23:55:41+5:30

आजघडीला विद्यार्थी आर्थिक व वेळेअभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही. विशेषकरून महिलावर्ग वेळेअभावी अर्धवट शिक्षण घेतात. परिणामी गावाचा विाकस मागे पडतो. त्यांना मुख्य शिक्षणाच्या

Study Center Knowledge of Ganges | अभ्यासकेंद्र ज्ञान गंगेचे माध्यम

अभ्यासकेंद्र ज्ञान गंगेचे माध्यम

जवाहरनगर : आजघडीला विद्यार्थी आर्थिक व वेळेअभावी शिक्षण पूर्ण करू शकत नाही. विशेषकरून महिलावर्ग वेळेअभावी अर्धवट शिक्षण घेतात. परिणामी गावाचा विाकस मागे पडतो. त्यांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात सामावण्यासाठी अभ्यासकेंद्रे ही घरोघरी ज्ञान गंगा पोहचविण्याचे माध्यम आहे, असे प्रतिपादन रातुम नागपूर विद्यापिठाचे माजी विद्धत परिषद सदस्य डॉ.जी.डी. टेंभरे यांनी केले.
तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय पेट्रोलपंप जवाहरनगर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्राचे उद्घाटन प्रसंगी डॉ.टेंभरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार मोहबंशी हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र संयोजक प्रा. एस.आर. गोंडाणे, प्रा. डॉ. साधना वाघाडे, प्रा. रत्नपाल डोहणे हे उपस्थित होते.
आधुनिक काळात गाव विकास साधायचा असेल तर महिलांनी पूर्ण शिक्षित व्हावे लागेल. परिणामी गाव विकास कुंबहूना देश विकसीत होईल याकरीता अभ्यासकेंद्र ही काळाची गरज आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मोहबंशी यांनी म्हटले.
तत्पुर्वी प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ अभ्यास केंद्राचे प्रमुख सुभाष गोंडाने यांनी केले. संचालन प्रा. डॉ. डोहणे यांनी केले. आभार प्रा. डॉ. साधना वाघाडे यांनी मानले.(वार्ताहर)

Web Title: Study Center Knowledge of Ganges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.