शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधणीसाठी विद्यार्थी प्रेरणा देणार

By admin | Updated: November 20, 2014 22:47 IST

शाळा ही शिक्षण देण्याच केंद्र आहे. अध्यापनातून शाळांना सामाजिक जबाबदारी पेलवता येणे शक्य आहे. असाच एक प्रयोग महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेने घेतला आहे. घर तिथं शौचालय झाले पाहिजे

मोहाडी : शाळा ही शिक्षण देण्याच केंद्र आहे. अध्यापनातून शाळांना सामाजिक जबाबदारी पेलवता येणे शक्य आहे. असाच एक प्रयोग महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेने घेतला आहे. घर तिथं शौचालय झाले पाहिजे याविषयीची गावात जनजागृती करणार आहे.महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, मोहगाव देवी येथे बालस्वच्छता अभियानांतर्गत जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने स्वच्छ शौचालय या विषयावर मार्गदर्शन शिक्षकांनी केले. याच कार्यक्रमात प्रत्येकांच्या घरी शौचालय आहे काय असा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. विद्यार्थी उभे झाले. बहुतेक विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नसल्याचे वास्तव पुढे आले.हे वास्तव इथेच थांबू नये यासाठी शाळेनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून घर तिथ शौचालय असावे यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रथमत: ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही त्या घरची बालके आपल्या आई-वडिलांना शौचालय तयार करण्यासाठी प्रेरित करतील. मोहगाव देवी शाळेत रोहणा, बोथली, मोहगाव देवी येथील विद्यार्थी येतात. ही मुले आपल्या गावी जनजागृती करणार आहे. शौचालय घरी नसल्याने मुली, महिलांची प्रचंड कुचंबना होते, शौचालयाच्या अभावी असुरक्षितता निर्माण होतो. तसेच ग्रामीण भागातील व्यक्ती घरी शौचालय राहूनही स्वच्छतागृहाचा वापर करीत नाही. उघड्यावर स्वच्छास जाण्याने रोगांना आमंत्रण देणारे असते. श्वापदांच्या भय असतो. या बाबी ग्रामीण जनतेला पटवून देण्यासाठी शाळेच्या वतीने पुढाकार घेण्याचे ठरविण्यात आले आहे.यावेळी शाळेत बालस्वच्छता अभियानाचा समारोप मुख्याध्यापक राजकुमार बांते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक धनराज वैद्य, हंसराज भडके, हेमराज राऊत, शोभा कोचे, गजानन वैद्य यांची उपस्थिती होती. यावेळी स्वच्छ शौचालय या विषयावर धनराज वैद्य, हंसराज भडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच स्वच्छतागृहा अभावी मुलींची शालेय शिक्षणात कसा अडथळा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो यावर मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी मार्गदर्शन केले. समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला तसेच विद्यार्थीनींनी रांगोळ्यांनी आपला वर्ग सजविला होता. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहपर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संचालन हेमराज राऊत व आभार प्रदर्शन शोभा कोचे यांनी केले. संपूर्ण अभियान उपक्रमात लिलाधर लेंडे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)