शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बघितला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 23:28 IST

भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा कसोटी सामना नागपूर येथील जामठा येथे पाहण्याकरिता तुमसर येथील जनता विद्यालयातील ५० विद्यार्थी तथा पाच शिक्षकांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाचारण केले होते.

ठळक मुद्देएकमेव शाळेची निवड : जनता विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा समावेश

आॅनलाईन लोकमततुमसर : भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान दुसरा कसोटी सामना नागपूर येथील जामठा येथे पाहण्याकरिता तुमसर येथील जनता विद्यालयातील ५० विद्यार्थी तथा पाच शिक्षकांना विदर्भ क्रिकेट असोसिएशनने पाचारण केले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भारतीय व श्रीलंका संघाचा सामना बघितला. भंडारा जिल्ह्यातून एकमेव जनता विद्यालयाला ही संधी प्राप्त झाली होती.नागपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुसरा कसोटी सामना पाहण्याकरिता जनता विद्यालयाच्या प्राचार्यांनी व्हीसीए प्रशासनाला परवानगी मागितली होती. आंतरराष्ट्रीय सामना पाहण्याकरिता व्हीसीए प्रशासनाने रितसर परवानगी दिली. यात रविवारी ५० विद्यार्थी व पाच शिक्षकांनी प्रत्यक्ष भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यानचा सामना बघितला.विद्यार्थी विद्यार्थिनींनी क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आस्वाद लुटला. भारताचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, रोहित शर्मा यांची फलंदाजी बघितली. व्हीसीए प्रशासनाने विद्यार्थ्यांना फराळ देऊन संबंधित अधिकाºयांनी विद्यार्थ्यांना क्रीडांगण व खेळाची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडीयम व परदेशी खेळाडू व भारतीय खेळाडू जवळून पाहिल्याचा क्षण शब्दात वर्णन करणे कठीण असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. खेळाचे जीवनात अत्यंत महत्व असून खेळामुळे खेळाडूला किती लोकप्रियता प्राप्त होते हे प्रत्यक्ष क्रीडांगणावर दिसल्याचे जाणवले. प्रत्यक्ष त्यांच्या आवडीच्या खेळाडूला बघण्याची संधी प्राप्त झाल्याने आनंद गगणात मावेनासा झाल्याची प्रतिक्रिया चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिली. आम्हाला नक्कीच यातून प्रेरणा मिळाली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.विद्यार्थ्यांसोबत जनता विद्यालयाचे प्राचार्य ए.एन. लंजे, वाय.आर. कापगते, आर.पी. गभणे, अजय बोरकर, आर.आर. कापगते यांचा समावेश होता.