शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

विद्यार्थी धडकले पंचायत समितीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 5:00 AM

जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार/मुंडीपार या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरीता जावयाचे असल्यास शाळा बंद करून जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार येथे इयत्ता पहली ते चवथीपर्यंत २५ विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहे. या शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.

ठळक मुद्देशिक्षकाच्या मागणीसाठी सिंदीपार येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सांगुनही शिक्षकाची नियुक्ती होत नसल्याने सिंदीपार (मुंडीपार) या शाळेतील संतप्त झालेले विद्यार्थी लाखनी पंचायत समिती कार्यालयात धडकले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी पंचायत समितीवर धडक देवून आपल्या मागणीकडे अधिकाऱ्यांने लक्ष वेधले. यासाठी विद्यार्थ्यांना अनेक पदाधिकाऱ्यांनी धीर देत लवकरच शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक नागरिकांसह शिक्षकांमधून होत आहे.जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार/मुंडीपार या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरीता जावयाचे असल्यास शाळा बंद करून जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार येथे इयत्ता पहली ते चवथीपर्यंत २५ विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहे. या शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये किशोर कमाने यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आली. मात्र त्यानंतर अधिकाºयांकडून दुसरा शिक्षक शाळेसाठी देण्यात आले नाही. अनेकदा कार्यालयीन कामकाजाकरिता पंचायत समिती तसेच केंद्र शाळेमध्ये जावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांना कोणाच्या भरशोवर सोडून जायचे, असा प्रश्न सदर शिक्षकाला गत काही दिवसांपासून सतावत आहे. कठोर मनाने काही प्रसंगी शाळा बंद करून कार्यालयीन कामकाजाकरिता जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शिक्षकांच्या मागणीकरिता यापूर्वी अनेकदा पालकांनी निवेदन दिले आहे. पंचायत समिती लाखनी येथील शिक्षण विभागात अनेकदा निवेदन देवूनही शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत शिक्षक दिला जात नाही. तोपर्यंत इथेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविणार, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.विद्यार्थ्यांनी पंचायत समिती प्रशासनास माहिती देवून येथेच शाळा भरविली असल्याचे निदर्शनास येताच अधिकाºयांना आश्चर्याचा धक्का बसला. ३० सप्टेंबर रोजी पटपडताळणीत मुरमाडी तुप येथे जी. जी. झलके हे सहायक शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांना आठवडाभरापुर्वीच सिंधीपार शाळेत रूजू होण्याचे पत्र देण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी बावनकुळे यांनी सांगितले.मात्र वरिष्ठांचा आदेश असतानाही अद्याप सदर शिक्षक का रूजू झाले नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे. मागण्यांच्या पुर्ततेसाठी चिमुकल्यांनी पंचायत समिती आवारात भरविलेली शाळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी