शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:39 PM

सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. याबाबत खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पुढाकार घेत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती थेट खात्यात जमा करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. याबाबत खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पुढाकार घेत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्या भंडारा शाखेच्या शिष्टमंडळाची सभा शिक्षणाधिकाºयांच्या दालनात पार पडली. यावेळी शिष्यवृत्तीपासून शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. जिल्ह्यातील सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांना ९९ लाख ८८ हजार ५२९ रुपये थेट खात्याद्वारे मिळणार होते. मात्र गलथान कारभारामुळे एप्रिल अखेरपर्यंत केवळ ३० लाख रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. आजही शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. या प्रकाराची माहिती होताच खासगी प्राथमिक शिक्षक संघाने पुढाकार घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापुरे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी करण्यात आली.शिष्यवृत्तीसोबत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. मान्यता प्रकरणी कोणत्याही कर्मचाºयाचे नियमित वेतन स्थगीत करू नये असे सांगण्यात आले. पुष्पा गायधने या अतिरिक्त शिक्षिकेचे मागील आठ महिन्यापासून वेतन बंद आहे. त्यांचे वेतन सुरु करावे अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी शिक्षणाधिकाºयांनी आदेश देत वेतन सुरु करण्याचे करणार असल्याचे सांगितले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया पाठ्यपुस्तकांचे संच अद्यापही खासगी शाळांना मिळाले नाही. तालुकानिहाय अतिरिक्त पुस्तके गोळा करून गरजू शाळांना ते देण्यात येतील असे यावेळी ठरविण्यात आले. विना अनुदान तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षकांना नियमानुसार मान्यता देण्यात येईल, अशा अनेक विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी शिक्षणाधिकारी एल.एस. पाच्छापुरे, वेतन पथक अधीक्षक आशिष चव्हाण, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद रेवतकर, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, कार्याध्यक्ष रहेमतउल्ला खान, गोपाल मुºहेकर, राजेश धुर्वे, विमाशिचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, दारासिंग चव्हाण, जिल्हा कार्यवाह विलास खोब्रागडे, कुणाल जाधव, धनीवर कान्हेकर, चंद्रशेखर राहांगडाले, ज्ञानेश्वर मेश्राम, पुरुषोत्तम लांजेवार, अरुण मोखारे, जयंत पंचबुद्धे, सुनील मेश्राम, अर्शद शेख, प्रेमलाल मलेवार, विजय साखरकर, ज्ञानेश्वर शहारे, अशोक गिरी, नीळकंठ पचारे, मोहनलाल सोनकुसरे, मिलिंद डोंगरे आदी उपस्थित होते.