फिरते पशुचिकित्सालयाला थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST2021-01-19T04:36:46+5:302021-01-19T04:36:46+5:30
पशुपालकांत तीव्र संताप लाखांदूर : पशुधन विभागाचे अभय व शासन प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने गत दोन महिन्यांपासून फिरत्या पशुचिकित्सालयाचे सहायक ...

फिरते पशुचिकित्सालयाला थांबा
पशुपालकांत तीव्र संताप
लाखांदूर : पशुधन विभागाचे अभय व शासन प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने गत दोन महिन्यांपासून फिरत्या पशुचिकित्सालयाचे सहायक पशुधन विकास अधिकारी बेमालूम असल्याने या चिकित्सालयाला थांबा मिळाला आहे. थांबा मिळाल्याने या चिकित्सालय अंतर्गत पशुधनाची उपचार सुविधा बंद पडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केले जात आहे.
लाखांदूर येथील पशुधन विभागांतर्गत ८ पशुवैद्यकीय दवाखाने तर एक फिरते पशुचिकित्सालय आहे. या पशु चिकित्सालयात तावशी, मानेगाव, बोरगाव, बोथली धर्मापुरी/पांढरगोटा व कोच्छी, दांड़ेगाव आदी गावांचा समावेश आहे. सदर पशुचिकित्सालयांतर्गत पशुधनाला शासनाच्या योजनेनुसार लसीकरण, औषधोपचार व अन्य सोयीसुविधांचा लाभ अपेक्षित आहे. त्यासाठी शासनाने तालुका पशुधन विकास अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यासह अन्य ३ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.
त्यानुसार गत काही वर्षापासून या चिकित्सालयात डॉ. मनवर नामक सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सबंधित अधिकाऱ्याच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप करीत शासकीय अभिलेखदेखील अद्ययावत नसल्याची ओरड आहे. यासबंधाने डॉ. मनवर यांना सबंधित विभागांतर्गत वारंवार सूचित करूनदेखील सदर अधिकारी हेतुपुरस्पर कानाडोळा करीत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सदर गैरप्रकाराची दखल घेत सबंधित अधिकाऱ्याचा वरिष्ठांकडे निलंबनाचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला असल्याची माहिती आहे. मात्र सदर प्रस्ताव सादर करूनदेखील अद्याप सबंधितांच्या विरोधात शासन-प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने या अधिकाऱ्याला खुद्द शासन-प्रशासनाचेच अभय तर नाही ना, असेदेखील बोलल्या जात आहे. तथापि गत दोन महिन्यांपासून सदर अधिकारी तालुका पशुधन कार्यालयाकडे कोणताही अर्ज दाखल न करता विना परवानगीने बेमालूम असल्याची ओरड आहे.
सदर अधिकारी दोन महिन्यापासून गैरहजर असल्याने सध्या या चिकित्सालयाचा कारभार खुद्द तालुका पशुधन विकास अधिकारी सांभाळत असतांना सबंधित अधिकाऱ्याला कसरत करावी लागत असल्याची माहिती आहे. सध्या तालुक्यास्त बर्ड फ्लू आजाराचा संसर्ग झाला नसला तरी पशुपालक अफवांमुळे दहशतीत दिसून येत आहेत. या परिस्थितीत सबंध शासन प्रशासन कामाला जुंपले असतांना या अधिकाश्यार्वर कार्यवाही करण्यास प्रशासनदेखील धजावत नसल्याने सबंधिताला नेमके अभय कोणाचे, असा संतापजनक सवाल पशुपालकांत केला जात आहे.
शासनाने तात्काळ दखल घेऊन दोन महिन्यापासून बेमालूम अधिकाऱ्याविना थांबा मिळालेले फिरते पशू चिकित्सालय पूर्ववत नियमित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे.