विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: February 9, 2016 00:36 IST2016-02-09T00:36:19+5:302016-02-09T00:36:19+5:30
लोकमत सखी मंचतर्फे तालुक्यातील विविध केंद्रावर, संक्रांत मेळाव्यांतर्गत तीळाचे व्यंजन, उखाणे, वेशभूषा व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

विविध स्पर्धांना सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकमत सखी मंचचा उपक्रम : विजेत्यांना बक्षिसांचे वाटप
लाखनी : लोकमत सखी मंचतर्फे तालुक्यातील विविध केंद्रावर, संक्रांत मेळाव्यांतर्गत तीळाचे व्यंजन, उखाणे, वेशभूषा व गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील सखी, युवती व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विजयी स्पर्धकांना बक्षिस व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
पोहरा येथील श्रीराम फटे विद्यालयात आयोजित देशभक्ती गीतगायन स्पर्धेत प्रियंका मते प्रथम, वनिता वडीचार द्वितीय तर तृतीय क्रमांकाकरिता निर्मला बावनकुळे यांनी प्राप्त केला. व्यंजन स्पर्धेत तिळ खजूर रोल, तिळाचे करंजी, मोदक, लाडू, बर्फी, पेढा इत्यादी पदार्थांचे सखींनी उत्कृष्ट सादरीकरण केले. करिता दिपाली रोकडे प्रथम, अनिता फटे द्वितीय व तृतीय प्रियंका मते प्रोत्साहनपर संगीता गिऱ्हेपुंजे यांची निवड करण्यात आली. वेशभूषा स्पर्धेत दिपाली रोकडे प्रथम, निर्मला बावनकुळे द्वितीय तर तृतीय रजनी भोंगाडे तसेच उखाणे स्पर्धेत अनिता फटे व ज्योती गायधनी यांची निवड करण्यात आली.
केसलवाडा (वाघ) येथे ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यंजन स्पर्धेत दुर्गा वाघाये प्रथम, हेमा पिंपळशेंडे द्वितीय तर तृतीय क्रमांकाकरिता शालीनी सरोदे यांची निवड झाली.
पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत पूनम वाघाये प्रथम, सविता लुटे द्वितीय, मनिषा काळे तृतीय, देशभक्तीपर गीत स्पर्धेत मंदा खंडारे प्रथम, मनिषा काळे द्वितीय व लता वाघाये तृतीय, उखाणे स्पर्धेत स्वाती लुटे प्रथम, लक्ष्मी सिंगनजुडे द्वितीय तर तृतीय क्रमांक दुर्गा सरोदे व पूनम वाघाये यांनी पटकाविला.
पालांदूर केंद्रात लक्ष्मी मुटकुरे यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात व्यंजन स्पर्धेत लक्ष्मी मुटकुरे प्रथम, ज्योती पिंपळे द्वितीय, सुमन मस्के तृतीय, पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत ज्योती पिंपळे प्रथम, संगीता घोनमोडे द्वितीय, गायत्री कडूकार तृतीय, देशभक्तीपर गीत स्पर्धेत प्रथम संगीता घोनमोडे, रुमा खंडाईत द्वितीय तर मंगला कडूकार तृतीय क्रमांकाकरिता निवडण्यात आले. उखाणे स्पर्धेत वैशाली शिवणकर प्रथम, सुष्मा येळणे द्वितीय तर मोहिनी लांजेवार तृतीय क्रमांकाकरिता पात्र ठरली. कार्यक्रमाचे संचालन व आभार तालुका सधी विभाग प्रतिनिधी शिवानी काटकर यांनी केले. विविध केंद्रातील कार्यक्रम आयोजक, नियोजक व सखींनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)