शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपासाठी विशेष शिबिर

By admin | Updated: June 6, 2016 00:37 IST

खरीप हंगाम सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळीच मिळण्याकरीता २८२ गावांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

भंडारा : खरीप हंगाम सन २०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळीच मिळण्याकरीता २८२ गावांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी गावनिहाय १३ ते १५ जून या कालावधीत आयोजित केलेल्या या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या शिबिरात सरपंच व पोलीस पाटील उपस्थित राहून योजनेची माहिती देणार आहेत. तसेच तलाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, डि.डी.सी. बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्राची यादी शिबिराच्या चार दिवसाआधी संबंधित शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहे. ज्या प्रकरणामध्ये त्रुटी आढळून येईल, अशा प्रकरणात सात दिवसाचे आत शेतकऱ्यांकडून पुर्तता करुन शिबिराचे दिवशीच पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार. या शिबिरासाठी तालुका निहाय समन्वयक अधिकारी म्हणून भंडारा- उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, पवनी- जिल्हा पुनर्वसन अधिकारी विजया बनकर, तुमसर- उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मोहाडी- उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय उरकुडे, साकोली- उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, लाखांदूर- उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी व लाखनी, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावांची संख्या व कालावधी याप्रमाणे आहे. भंडारा - ८६ गावे, पवनी-३३ गावे, तुमसर- ५७ गावे, मोहाडी- २५ गावे, साकोली ३६ गावे, लाखांदूर- २१ गावे, लाखनी- २४ गावे अशी एकूण २८२ गावात हे शिबिर १३ जून ते १५ जून २०१६ या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत होणार आहेत.या विशेष शिबिराचा लाभ घेवून पीक कर्ज उपलब्ध करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)