शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
2
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
3
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
4
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
6
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
7
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
8
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
9
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
10
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
11
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
12
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
13
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
14
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
15
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
16
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
17
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
18
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
19
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
20
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेच्या कंदील वाटपात घोळ

By admin | Updated: July 12, 2014 23:32 IST

महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत देण्यात येणाऱ्या विशेष घटक योजनेंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या सोलर कंदील वाटपात अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना वगळून

साकोली : महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत देण्यात येणाऱ्या विशेष घटक योजनेंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या सोलर कंदील वाटपात अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांना वगळून इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात आला. या सर्व प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, अशी तक्रार जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्या व साकोलीच्या जिल्हा परिषद सदस्या गीता कापगते यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे केली आहे.
या तक्रारीनुसार जिल्हा परिषद भंडारा महिला व बालकल्याण विभागातर्फे सन २०१०-११ व २०१२-१३ या वर्षात विशेष घटक योजना शासननिधी अंतर्गत लाभार्थ्याची निवड करण्यात आली होती.
अनुसूचित जाती घटकातील नावे करून ओबीसी व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना नियमबाह्यरीतीने लाभ देण्यात आला आहे. सन २०११-१२ यादी क्रमांक २२० संगीता गुरूप्रसाद राऊत साकोली यांच्याऐवजी छाया छगन पात्रीकर रा. उमरी यांना लाभ देण्यात आला.
सन २०१२-१३ मधील यादी क्रमांक ८३ नुसार नलू शेखर गोंडाणे रा. गडकुंभली यांचेऐवजी शारदा पद्माकर लांजेवार रा. सेंदुरवाफा यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती आहे. सन २०११-१२ नुसार जयश्री अनिरूद्ध राऊत रा. बाम्पेवाडा यादी क्रमांक १७१, १००, १५६ यांचेऐवजी सुभद्रा काशीनाथ कापगते रा. वांगी यांना लाभ देण्यात आला.
सन २०१२-१३ मधील यादी क्रमांक ४४, ५३ नुसार यमु आनंद रंगारी रा. साकोली यांचेऐवजी निर्मला रामदास शिवणकर रा. पळसगाव यांना लाभ देण्यात यावा. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गीता कापगते यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)