लोककलेतून सामाजिक समता
By Admin | Updated: January 18, 2016 00:29 IST2016-01-18T00:29:55+5:302016-01-18T00:29:55+5:30
महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वान शाहीरी परंपरा निर्माण झाली. या परंपरेने सर्व समाजातील जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम केले.

लोककलेतून सामाजिक समता
राजकुमार बडोले : लोककलावंतांचा मेळावा
लाखनी : महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वान शाहीरी परंपरा निर्माण झाली. या परंपरेने सर्व समाजातील जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम केले. लोककलावंत खऱ्या अर्थाने संस्कृतीची जोपासना करीत आहे. कलावंतांच्या माध्यमातून आजही प्रबोधनाचे महत्वपूर्ण काम केले जात आहे. राज्यात खऱ्या अर्थाने सामाजिक समता निर्माण करण्याचे काम लोककलावंतांनी केले आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील मासलमेटा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषदद्वारे जिल्हास्तरीय लोककलावंतांच्या मेळाव्यात ते.बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परीषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, अतिथी म्हणून खासदार नाना पटोले, पंचायत समिती सदस्य सरिता कानतोडे, मोरेश्वरी पटले, अॅड.पी.के. रहांगडाले, वसंत कुंभरे, सरपंच शालीनी रामटेके, अनिता वंजारी, धनलाल पटले, महादेव गणवीर, श्रावण कापगते, प्रदीप रहांगडाले, मुख्याध्यापक पडोळे, रविंद्र रामटेके, रमेश पटले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ना.राजकुमार बडोले यांच्या हस्ते लोककलावंतांचा सत्कार करण्यात आला. बडोले यांनी शेतकऱ्यांसाठी निर्धारीत केलेली आणेवारीची पद्धत दुरुस्त करून सर्व शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचा विचार शासन करणार असल्याचे सांगितले.
मेळाव्यात राजस्थानासह जिल्ह्यातील ८० मंडळांनी सहभाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक शाहीर परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष धर्मदास भिवगडे यांनी केले. संचालन बिरला गणवीर यांनी, आभार प्रदर्शन उपसरपंच रामनाथ पारधीकर यांनी केले.
मेळाव्यासाठी प्रितम पटले, मिलिंद खोब्रागडे, आशीर्वाद राहुले, दशरथ बावणे, नारायण रहांगडाले, शंकर बिसेन, ज्योती वाघाये, सविता कुंभरे, रेवता पटले, कुंदा पुडके, सरिता मेश्राम, अनिता पटले, परीक्षित मेश्राम, प्यारेलाल पटले, कृष्णा भगत, क्रिष्णा राणे, दुलीचंद पटले, पद्माकर खोब्रागडे यांच्यासह विदर्भ शाहीर कलाकार परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)