शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवानगीने कापली झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी चारगाव येथील भीमराव मोटघरे यांनी केली आहे.

ठळक मुद्देचारगाव येथील प्रकार : कारवाईसाठी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनविभाग किंवा महसूल विभागाची परवानगी न घेता शेतशिवारातील ३१ झाडे कापून नेल्याचा प्रकार साकोली तालुक्यातील चारगाव येथे उघडकीला आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी साकोली पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केल्यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी संबंधित इसमावर कारवाई करावी अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी चारगाव येथील भीमराव मोटघरे यांनी केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात भीमराव मोटघरे यांनी नमूद केले आहे की, चारगाव येथे गट क्रमांक ५२/२ व ५२/३ मध्ये सामूहीक शेती आहे. या शेतातील ३१ झाडे वामन पांडूरंग डोंगरवार व लाखनी येथील मितेश गिºहेपुंजे यांनी वनविभाग किंवा अन्य विभागाची परवानगी न घेता तोडून (चोरून) नेऊन विक्री केली. यासंबंधात साकोली पोलीस ठाण्यात गैरअर्जदारांच्या बयाणात या आशयाची बाबही नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना साकोलीतील सहाय्यक वनसंरक्षक यांचे पत्र असतानाही अर्जदाराला न्याय मिळालेला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांशी संगनमत असल्यानेच आरोपीतांवर कारवाई होत नसल्याचे म्हटले जात आहे. पोलीस विभागही डोंगरवार व गिऱ्हेपुंजे यांची पाठराखण करीत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.साग झाडासह अन्य झाडे तोडून नेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, झाडांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन अहवालाच्या प्रतीसह पोलीस आयुक्तांनाही पाठविण्यात आले आहे.सागाच्या झाडांचाही समावेशचारगाव शेतशिवारातून तोडण्यात आलेल्या ३१ वृक्षांपैकी सागाच्या झाडांचाही समावेश आहे. शेतशिवारातील वृक्ष किंवा झाडे तोडण्यासाठी वनविभाग किंवा वेळप्रसंगी महसूल प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वृक्षतोडीच्या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनासह अन्य विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

 

टॅग्स :forestजंगल