सोरणा तलावातील कालव्यात झुडपांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:01 AM2018-09-14T01:01:02+5:302018-09-14T01:02:13+5:30

लघु पाटबंधारे विभाग शाखा आंधळगाव अंतर्गत येत असलेल्या सोरणा तलावाच्या लोहारा, तळगावकडे जाणाऱ्या मुख्य कालव्याच्या आतमध्ये मोठ मोठे झाडे असल्याने कालवा बुजल्यासारखा आहे. कालव्यापेक्षा तो भाग जंगल व्याप्त आहे कालव्यात मोठे झाडे जगल्याने पाणी पुढे पुरेशा जात नाही.

Shrub Empire in the canal of Sorna Lake | सोरणा तलावातील कालव्यात झुडपांचे साम्राज्य

सोरणा तलावातील कालव्यात झुडपांचे साम्राज्य

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : पाणी सोडण्यापूर्वी साफसफाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
जांब (लोहारा) : लघु पाटबंधारे विभाग शाखा आंधळगाव अंतर्गत येत असलेल्या सोरणा तलावाच्या लोहारा, तळगावकडे जाणाऱ्या मुख्य कालव्याच्या आतमध्ये मोठ मोठे झाडे असल्याने कालवा बुजल्यासारखा आहे. कालव्यापेक्षा तो भाग जंगल व्याप्त आहे कालव्यात मोठे झाडे जगल्याने पाणी पुढे पुरेशा जात नाही. तेवढ्या भागामध्ये पाणी तुंबत आहे.
दरवर्षी या कालव्यातील झाडे, झुडपे, गवत कापून कालवे सोरणा तलावातील पाणी सोडण्यापूर्वी साफ करणे गरजेचे आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा अधिकाऱ्याकडे ही समस्या माडली परंतु अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी सुध्दा त्या कालव्यामध्ये मोठ मोठे झाडे आहेत. परंतु अजुनपर्यंत त्या कालव्यातील झाडे कापले गेले नाही. शेतकऱ्यांच्या धानपिकाला सोरणा तलावातील पाणी सोडण्याची वेळ आली आहे. परंतु अजुन पर्यंत त्या कालव्याची झाडे कापले गेले नाही. तसेच कालव्याच्या आतील भागातील गवत साफ करण्यात आला नाही. याकडे शाखा अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. तरी संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देवून सोरणा तलावातील पाणी धान पिकाला सोडण्यापूर्वी सोरणा तलावातील लोहाराकडे येणाऱ्या कालव्यातील झाडे व गवत कापून साफ करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Shrub Empire in the canal of Sorna Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.