मिनी दारु कारखान्यावर धाड

By Admin | Updated: April 28, 2017 00:31 IST2017-04-28T00:31:47+5:302017-04-28T00:31:47+5:30

वरठी येथे असलेल्या एका घरी दारु बनविणाऱ्या अड्यावर धाड घातली. यात तिघांना अटक करण्यात आली.

Shot on mini ammunition factory | मिनी दारु कारखान्यावर धाड

मिनी दारु कारखान्यावर धाड

तिघांना अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
भंडारा : वरठी येथे असलेल्या एका घरी दारु बनविणाऱ्या अड्यावर धाड घातली. यात तिघांना अटक करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या अवैध मद्य निर्मिती व विक्री बाबत पाच दिवसीय विशेष मोहिमेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांचे मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षकांनी गुप्त माहितीच्या आधारे शास्त्री वॉर्ड वरठी येथील संशयीत घरावर छापा घातला.
तेथे मध्यप्रदेश राज्यात निर्मित व तेथेच विक्रीस असलेली बॉम्बे स्पेशल विस्की व त्यापासून महाराष्ट्रातील नामांकित विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यामध्ये बनावट विदेशी मद्य भरुन विक्रीस तयार केलेले, त्याचप्रमाणे बनावट झाकणे, बनावट बॉटल, लेबल, कॉक, १ दुचाकी व इतर साहित्य असा ४५,०४० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात आरोपी धीरज आनंदराव भेदे (२५) रा. गांधी वॉर्ड भंडारा, विक्रांत प्रेमदास भालाधरे (२६) शास्त्री वॉर्ड वरठी, अमरदीप प्रेमदास नंदागवळी (२६) रा. गौतम बुध्द वॉर्ड भंडारा या तीन आरोपीस महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत विभागाचे निरीक्षक एस. एच. मेहकरकर, दुय्यम निरिक्षक एम. एल. मोहीते, सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले तसेच जवान जियालाल अंबुले, नरेंद्र कांबळे, जयघोष जनबंधु, महिला जवान सविता गिऱ्हेपुंजे यांनी सहभाग घेतला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Shot on mini ammunition factory