शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दुकानदाराकडे मूळ डी-वन रजिस्टरच नाही

By admin | Updated: April 21, 2017 00:41 IST

मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे मुळचा डी-वन रजिस्टर नाही. प्रमाणित न केलेला चौकशी

चौकशीला दिरंगाई : चौकशी अधिकारी आल्यापावली परतलेमोहाडी : मोरगाव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानदाराकडे मुळचा डी-वन रजिस्टर नाही. प्रमाणित न केलेला चौकशी अधिकाऱ्यांनी आनलेला डी-वन वर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. धान्य दुकानदारांनी बनावट डी-वन सादर करुन दिशाभूल केली आहे. तथापि, या चौकशी प्रकरणात होणारी दिरंगाईच खूप खोलवर अनियमिततेचा पाणी मूरत असल्याचे दिसून येत आहे.सरकारी स्वस्त धान दुकानदाराचे मागील सहा वर्षापासून बनावट नावाने अधिकचा धान्य साठा उचलून शासकीय कोष आपल्या घशात घातले. याचा बिंग गावकऱ्यांनी २७ मार्च रोजी तहसील कार्यालयात तहसीलदारांसमोर उघड केला. याआधी लेखी, तोंडी निवेदन देवूनही प्रशासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे मोरगाववासियांनी तहसीलमध्ये ठाण मांडून एल्गार पुकारला होता. त्यानंतर त्याच दिवशी मौका पंचनामा करण्यात आला. धान्य साठा पोलीस पाटलांकडे हस्तातरीत करण्यात आला. कासवगतीने चौकशी होत राहीली. मोरगावचे दुकान मोहाडीला जोडण्यात आले. दुकानदारांनी दस्ताऐवज काही दिवसांनी तहसील कार्यालयात जमा केले. पण, मुळ डी-वन रजिष्टर जमा झालाच नाही. गावातील किती शिधापत्रिकाधारकांना अन्न-धान्य प्राप्त झाले. बनावट शिधापत्रिका किती याचा शोध घेण्यासाठी तलाठयांकडून चावडी वाचन ठेवण्यात आली. पण, मूळ डी-वन रजिष्टर नसल्याने चावडी वाचन होवू शकली नाही. बनावट डी-वन आणण्यात आला होता. त्यावर कोणत्याही अधिकाऱ्यांनी प्रति स्वाक्षरी नव्हती. गावकऱ्यांनी आधी मूळ डी-वन आना नंतरच पुढची चौकशी होईल अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतरही पुरवठा निरीक्षक सागर बावरे व कोतवाल चंदन नंदनवार चौकशीला गेले. पण त्यांना आल्या पावली परतावे लागले. चौकशी तीन दिवसात करु असे सांगणारे अधिकारी एक महिना लावत आहेत. गावकऱ्यांनी आयुक्ताची भेट घेतली. चौकशी संबधात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पत्र आलाय. पण, अंतिम निकालापर्यंत चौकशी का जात नाही याबाबत गावकऱ्यांच्या शंकेला जागा मिळाली आहे. गावकऱ्यांनी २४ एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे ठरविले आहे. चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून दुकानदाराला दोषी ठरविण्यात आल्याचे वृत्त आहे.(तालुका प्रतिनिधी)