भंडारा बसस्थानकावर खळबळ ! प्रसाधनगृहात सापडला महिलेचा मृतदेह
By युवराज गोमास | Updated: October 16, 2025 18:44 IST2025-10-16T18:35:01+5:302025-10-16T18:44:23+5:30
Bhandara : आपल्या मुलासह वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा शहरातील खासगी दवाखान्यात आल्या होत्या.

Shock at Bhandara bus stand! Woman's body found in toilet
भंडारा : स्थानिक बसस्थानकातील महिला प्रसाधनगृहात एक वृद्ध महिला मृत अवस्थेत आढळल्याने बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी अंदाजे १:१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रवाशांनी प्रसाधनगृहातील शौचालयात महिला बेशुद्ध स्थितीत पडल्याचे पाहून तत्काळ वाहतूक निरीक्षक रिक्की बोधनकर यांना माहिती दिली. त्यांनी महिला सुरक्षा रक्षकासह तत्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता महिला मृतावस्थेत असल्याचे आढळले.
घटनेची माहिती पोलिस ठाणे, भंडारा यांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत महिलेचे नाव अंजना ढेकल मेश्राम (७५,, रा. नागपूर) असे आहे. त्या आपल्या मुलासह वैद्यकीय तपासणीसाठी भंडारा शहरातील खासगी दवाखान्यात आल्या होत्या. महिला मृत अवस्थेत असल्याची खात्री झाल्यानंतर टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क साधून तत्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पोलिसांनी मृतदेह सामान्य ग्रामीण रुग्णालय, भंडारा येथे पुढील तपासणी व कार्यवाहीसाठी पाठविला असून प्रकरणाचा पुढील तपास भंडारा पोलिसांकडून सुरू आहे.