शिवतीर्थावर उसळला भक्तांचा जनसागर

By Admin | Updated: January 17, 2016 00:41 IST2016-01-17T00:41:14+5:302016-01-17T00:41:14+5:30

लाखनी तालुक्यातील पालांदूर नजीकच्या चुलबंध नदी काठावरील शिवतीर्थावर मकरसंक्रांतीच्या पर्वावर हर्षाेउल्हासात यात्रा उत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पडला.

Shiva Tirtha bhakta ka Jansagar | शिवतीर्थावर उसळला भक्तांचा जनसागर

शिवतीर्थावर उसळला भक्तांचा जनसागर

भक्तांची मांदियाळी : नदीपात्रात तरूणाईचा जल्लोष
मुखरू बागडे पालांदूर
लाखनी तालुक्यातील पालांदूर नजीकच्या चुलबंध नदी काठावरील शिवतीर्थावर मकरसंक्रांतीच्या पर्वावर हर्षाेउल्हासात यात्रा उत्सव मोठ्या भक्तीभावाने पार पडला.
खुनारी/ खराशी चुलबंध काठावरील शिवमंदिरात हभप बांगरे महाराज यांनी भक्तांकरिता आध्यात्मीक धडे देत प्रवचनातून मकरसंक्रातीचे महत्व विशद केले. दिव्य आयुष्य प्राप्तीकरीता प्रत्येक मानवाने कर्मदृष्टी प्रगत ठेवण्याचे आवाहन केले. निर्वासनीपणा माणसाला सुदृढ आयुष्य देतो. सदा हसतमुख जगा, जीवनात गुरूला महत्व द्या आदी अनेक पैलू तीन तासाच्या संगितमय प्रवचनात भक्तांना मंत्रमुग्ध केले. पौष महिन्याच्या आरंभाला सुर्य मकरराशीत प्रवेश करतो. सुर्याचे भ्रमण तिळाएवढ्या अंतराने वाढत जाते. त्यामुळे दिवस मोठा व रात्र लहान होते. याच पर्वाला मकरसंक्रांत म्हणतात. दक्षिणेकडील लोक यालाच पोंगल म्हणतात. शुभसंदेशाने एकमेकांना शुभेच्छा देत तिळ गुळ घ्या व गोड गोड बोला असा मराठी संस्कृतीचा संदेश स्त्री, पुरूष एकमेकांना देत आपआपसातील भेदभाव, दुरावा विसरून नव्या तेजाने व दमाने जगण्यातला गोडवा वाढवून मोठ्या हर्षाेत्सवाने भक्तगण, तरूणाई शिवतीर्थावर जमली होती. अगदी सकाळपासूनच शिवतीर्थावर गर्दी वाढत होती. लहान मोठे व्यापारी, खेळणीचे दुकान, फळ, रसवंती, हॉटेल यांची शिवतीर्थावर आदल्या दिवसापासूनच उपस्थिती होती. माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांनी आरोग्य शिबिर घेऊन भक्तांना सेवा दिली. शिवतीर्थावर भक्तांच्या सोईकरीता खराशी, खुनारी, दिघोरी येथील ग्रामस्थांनी आठ दिवसांपासून डेरेदाखल राहत सेवेकरीता प्रयत्न केले. पालांदूरचे ठाणेदार खंडाते, पियुष बाच्छल. वाहतूक पोलीस गजानन नेमाडे यांनी सहकार्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवत शांतता कायम ठेवित वाहतूक सुरळीत ठेवली.
शिवतीर्थाला आमदार बाळा काशिवार, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उमराव आठोडे, पंचायत समिती सदस्या गाढवे, उपसरपंच महादेव निंबार्ते, शिक्षक यशवंत सेलोकर यांनी भेट देत शिवजींचे दर्शन घेत जनतेला मार्गदर्शन केले. दहीकाला फोडून कार्यक्रमाला गोड करण्यात आला. संचालन सुधन्वा चेटूले, प्रास्ताविक सरपंच हेमंत सेलोकर खुनारी, आभार जितेंद्र कठाणे उपसरपंच पाथरी यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Shiva Tirtha bhakta ka Jansagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.