वाकाटक काळाची साक्ष देताहेत ‘शिलाप्रकस्थ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 00:42 IST2016-03-18T00:42:01+5:302016-03-18T00:42:01+5:30
वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करुन देणारे शिला प्रकस्थ डालमेंट्स पवनी तालुक्यातील खैरी (तेलोना) पिंपळगाव (नि) येथे आहेत.

वाकाटक काळाची साक्ष देताहेत ‘शिलाप्रकस्थ’
पवनी : वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करुन देणारे शिला प्रकस्थ डालमेंट्स पवनी तालुक्यातील खैरी (तेलोना) पिंपळगाव (नि) येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहून गावाजवळील जंगलातील मानसरा तलावाजवळ आहे. अनेक शतकापुर्वीच हे प्राचीन ऐतिहासिक शिलाप्रकस्थ उन्ह पाऊस, वारा, वादळ यांचा सामना करीत वाकाटक काळाची साक्ष देत आजही उभे आहेत. या प्राचीन शिलाप्रकस्थांचे संरक्षण करण्याची गरज आहे.
ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगरात आजही खोदकामात प्राचीन वस्तू मिळतात. अनेक शतकाच्या पुर्वी पवनी हे बौध्द धर्माच्या प्रसाराचे केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात पवनी नगराला फार महत्व होते. १९६८-७० मध्ये पुरातत्व विभाग व नागपुर विद्यापिठाने डॉ. मिराशी व डॉ. देव यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ टेकडीच्याखाली केलेल्या खोदकामात भारतातील सर्वात मोठा प्राचीन बौध्दस्तूप आढळून आला आहे. या स्तुपाचे अवशेष आजही मुंबई, दिल्लीच्या वस्तू संग्रहालयात ठेवले आहेत. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा ही पवनी मार्गे बौध्दधर्माचा प्रसार करण्याकरिता दक्षीणत गेल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो.
इ.स. सातव्या शतकात गुण्त वंशाचे राज्य भारतात होते. त्यांची राजधानी पाटलीपुत्र होती. या गुण्तवंशात समुद्रगुण्त, चंद्रगुण्त, विक्रमादित्य आदी सम्राट होवून गेले. त्यावेळेस विदर्भात वाकाटक राजाचे राज्य होते. वाकाटक पराक्रमी असल्यामुळे गुण्तांनी नातेसंबंध जोडले होते. वाकाटकाच्या काळात त्यांच्या साम्राज्यांची ओळख व्हावी याकरिता गावा-गावात शिलाप्रकस्थ डालमेट्स स्थापित केले होते. हे शिलाप्रकस्थ वाकाटकाच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. चुलीच्या आकाराचे तीन दगड ठेवून त्यावर एक मोठा भव्य सपाट दगड ठेवला आहे. या शिलाप्रकस्थांना स्थानिक लोक तेलगोटा म्हणतात. याची पुजाही करतात. हे शिलाप्रकस्थ खैरी (तेलीता), पिंपळगाव(नि.) येथे आहेत. पण अश्याच प्रकारचे एक शिलाप्रकस्थ पवनी पासुन ७ किमी अंतरावरील पाहुनगाव जवळील जंगलातील भानसारा तलावाजवळ आहे. या जंगलाचा समावेश उमरेड-करांडला अभयारण्यात करण्यात आल्यामुळे येथे जाण्याला बंदी आहे. हे तिन्ही शिलाप्रकस्थ डालमेंट्स खुल्या जागेत उन्ह, पाऊस, वादळ, वारा याचा सामना करीत वाकाटक साम्राज्याची ओळख व प्रसिध्दी करुन दिल्यास तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रात अजून भर पडणार आहे. व शिलाप्रकस्थ असलेले स्थळे पर्यटनस्थळाच्या यादीत यावयास वेळ लागणार नाही. (शहर प्रतिनिधी)