कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा सातवा दिवस

By Admin | Updated: July 21, 2014 23:42 IST2014-07-21T23:42:39+5:302014-07-21T23:42:39+5:30

आपल्या विविध मागण्यांकरिता आंदोलन करीत असलेल्या नगर पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा आज सातवा दिवसात प्रवेश केला आहे. सध्या तरी या आंदोलनाचा प्रभाव जनतेवर पडला नाही.

The seventh day of the workers' agitation | कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा सातवा दिवस

कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा सातवा दिवस

संप नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा : नागरिकांना फटका बसणार!
पवनी : आपल्या विविध मागण्यांकरिता आंदोलन करीत असलेल्या नगर पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचा आज सातवा दिवसात प्रवेश केला आहे. सध्या तरी या आंदोलनाचा प्रभाव जनतेवर पडला नाही. पण या कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केल्यास याचा प्रभाव जनतेवरही पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आंदोलनामुळे कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे त्याचा फटका सामान्य सुविधांवर पडत आहे. बाजारामध्ये जागोजागी कचरा पडलेला दिसत आहे.
येथील नगर पालिका कर्मचाऱ्यांनी १५ जुलै पासून आपल्या विविध मागण्यांकरिता काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात ७१ पैकी ६६ कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या आंदोलनाचा प्रभाव सरळ जनतेवरप डणार असल्यामुळे पवनीचे नगराध्यक्ष मोहन सुरकर, मुख्याधिकारी रविंद्र भेलावे, विरोधी पक्ष नेते धर्मेंद्र नंदरधने, भास्कर उरकुडकर आदी पदाधिकारी तोडगा काढण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त नागपूर यांना भेटून या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या मागणीचे निवेदन देवून स्थितीची माहिती दिली आहे. समस्येवर अजूनतरी तोडगा निघाला नाही. जर हे आंदोलन अजून सुरु राहिल्यास याचा सरळ प्रभाव जनतेवर पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची बाब खुद्द कर्मचारी बोलून दाखवित आहेत.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The seventh day of the workers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.