साकोली परिसरात खुलेआम दारुविक्री
By Admin | Updated: March 23, 2015 00:45 IST2015-03-23T00:45:24+5:302015-03-23T00:45:24+5:30
तालुक्यात अवैध दारु विक्री पोलिसांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरु आहे. अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.

साकोली परिसरात खुलेआम दारुविक्री
साकोली : तालुक्यात अवैध दारु विक्री पोलिसांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरु आहे. अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत आहे. परिसरात खुलेआम गावागावात दिवसाढवळ्या दारु पोहोचविली जाते.
साकोली तालुक्यात मोजक्याच गावात परवानाधारक देशी दारुची दुकाने असली तरी पोलिसांच्या आर्शिवादाने प्रत्येक गावात तीन ते चार अवैध दारुविक्रीची दुकाने आहेत. यामुळे युवापिढीसह वृध्दापर्यंत बरेचजन दारुच्या आहारी गेले आहेत. अनेकांची संसार या दारुच्या व्यसनामुळे उध्वस्त झाली आहेत.
गावागावात फोफावलेल्या या अवैध व्यवसायीकांनी दारुविक्री करताना सोपी व्हावी म्हणून साकोली येथील काही लोकानी पोलिसांशी साठगाठ करुन पैशाचे आमीष देऊन ते खुलेआम दारु दिवसाढवळयाच गावोगावी पोहोचून देतात. या गोरखधंद्याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही दुर्लख केले आहे. (तालुका प्रतिनिधी)