स्वावलंबी जीवनासाठी बचतगट प्रभावी माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:17 IST2018-03-20T00:17:28+5:302018-03-20T00:17:28+5:30
शैक्षणिक क्रांतीमध्ये सर्वांना नोकरी मिळणे सहजासहजी शक्य नाही. चुल आणि मुल यावरच समाधान आजघडीला मानता येणार नाही. महिलांनी एकत्रित येऊन उद्योगाची कास धरावी.

स्वावलंबी जीवनासाठी बचतगट प्रभावी माध्यम
आॅनलाईन लोकमत
जवाहरनगर : शैक्षणिक क्रांतीमध्ये सर्वांना नोकरी मिळणे सहजासहजी शक्य नाही. चुल आणि मुल यावरच समाधान आजघडीला मानता येणार नाही. महिलांनी एकत्रित येऊन उद्योगाची कास धरावी. हिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहुन इतरानाही संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. यासाठी बचत गट निर्माण करा. परिणामी स्वालंबी जीवनासाठी बचत गट हे एक प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती विस्तार अधिकारी अतुल वर्मा यांनी केले.
महाला राजसत्ता आंदोलन व ग्रामपचांयत ठाणा पेट्रोलपंप यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत प्रांगणात महिला मेळाव्याचे आयोजन केले. त्याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी अतुलकुमार वर्मा बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा पवार या होत्या. यावेळी विस्तार अधिकारी श्याम भोयर (लाखनी) एम. एफ. भुजाडे (तुमसर), सामाजिक कार्यकर्ता माधुरी देशकर, महिला राजसत्ता आंदोलन समिती इाण्याचे अध्यक्ष आशा शेंडे, उपसरपंच विनोद तिरपुडे, सदस्य जयश्री काटेखाये, वैशाली देशभ्रतार, रुपलता भागवत, प्रमिला मेश्राम, मंदा कांबळे, हेमलता मालाधरे, भारती भोयर, भारती ठवकर, यशवंत तिजारे, ग्रामविकास अधिकारी एच. डी. सतदेवे उपस्थित होते.
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वत:चा सोबत आपल्या गावांचा विाकस करावा असे सखोल मार्गदर्शन माधुरी देशकर, एम. भुजाडे, श्याम भोयर यांनी केले. याप्रसंगी चेतना महिला बचत गट व वनश्री महिला बचत गट द्वारे फरजाना शेख व मंजु गजभिये यांनी दारुमुळे घर संसार कसा विस्काळीत होतो. याविषय नाटीका सादर केले.
कुटूंब नियोजन व अंधश्रध्दा या विषयी एकपात्री नाटीका कल्याणी तिरपुडे हिने सादर केले. तर श्रावणी पवार, चैतन्या वंजारी, मेघा कांबळकर, वंश बसेशंकर, चैतन्य पवार, शुभांगी खंडाळे यांनी बेटी बचाओ बेटी पढावो विषयी नाटीका सादर केली. यावेळी भारुड, पथनाट्य, राजस्थानी नृत्य कल्याणी लेझीम ग्रृपद्वारे सादर करण्यात आले. संचालन आशा शेंडे यांनी केले. आभार एच. डी. सतदेवे यांनी मानले.