शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या १३ गटात तिरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ओबीसी आरक्षणाने स्थगित झालेल्या जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचार आता चरमसीमेवर पोहोचला ...

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी आरक्षणाने स्थगित झालेल्या जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचार आता चरमसीमेवर पोहोचला असून, बहुतांश गटांमध्ये तिरंगी तर काही गटांत सरळ लढतीचे चित्र आहे. कोरोना संसर्ग असल्याने अगदी मोजक्या सभा होत असून, उमेदवार प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहेत.तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा आणि गर्रा या तीन गटांची निवडणूक होत आहे. तीन जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असून, तीनही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. नेत्यांच्या सभा झाल्या. परंतु कोरोनामुळे उपस्थिती अत्यल्प दिसत होती. मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव आणि कांद्री गटात सरळ लढत तर वरठी गटात तिरंगी लढत होत आहे. तीन जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा तालुक्यातील सिल्ली गटासाठी निवडणूक होत असून, सहा उमेदवार रिंगणात आहेत. येथेही तिरंगी लढतीचे चित्र आहे. पवनी तालुक्यातील ब्रह्मी व भुयार या दोन गटांत ११ उमेदवार रिंगणात असून, येथेही तिरंगी लढतीचेच चित्र आहे.कोरोना संसर्ग असल्याने उमेदवारांना प्रचार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेत्यांच्या सभा होत असल्या तरी त्या कमी मतदारांच्या उपस्थितीत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे उमेदवार थेट मतदारांच्या भेटीवर भर देत आहेत. आता १८ जानेवारी रोजी मतदान होणार असून, उमेदवार विजयासाठी जीवाचे रान करीत आहेत.

लाखनीच्या चारही गटात तिरंगी लढत

- जिल्ह्यातील सर्वाधिक चार गटांत लाखनी तालुक्यात निवडणूक होत आहे. लाखोरी, मुरमाडी/सावरी, केसलवाडा/वाघ आणि मुरमाडी/तुप या गटांत ही  निवडणूक होत आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असून, चार जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. चारही गटांत तिरंगी लढतीचे चित्र असून, कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक उमेदवार विजयासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावर भर देत आहे.

पंचायत समितीत चुरस- जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या स्थगित झालेल्या २५ जागांसाठी जिल्ह्यात चांगलीच चुरस दिसत आहे. उमेदवार प्रचारासाठी मतदारांच्या भेटी घेत आहेत. मात्र कोरोना संसर्गामुळे त्यांना प्रचार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पंचायत समितीतही तिरंगी-चौरंगी लढतीचे चित्र असून उमेदवार विजयासाठी प्रयत्न करीत आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदOBCअन्य मागासवर्गीय जाती