शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरच्या गणेश भवन इमारतीवर हातोडा मारण्याचे एसडीओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 05:00 IST

तुमसर येथील बोसनगरात गणेश भवन इमारत असून या इमारतीत गत ३५ ते ४० वर्षांपासून ११ दुकाने असून, तुमसर येथील नामवंत जनता कनिष्ठ महाविद्यालय भरत आहे. इमारत मालकाने जीर्ण इमारत असल्याचे सांगून दुकानदार व शाळा प्रशासनाला बाहेर काढण्याकरिता कट कारस्थान रचले आहे. वास्तविक ही इमारत मालकाने बिल्डरांना विक्री केली आहे. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे सांगण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील बोसनगरात असलेले गणेश भवन इमारतीवर हातोडा चालविण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ही कारवाई करण्याचे आदेश आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थानांतरणाच्या केवळ दोन दिवसांपूर्वी तडकाफडकी इमारत पाडण्याचे आदेश दिल्याने आदेशावर शंका उपस्थित होत आहे. अकरा दुकानदार व शाळा रिकामी करण्याकरिता केवळ २० तास देण्यात आले आहे. हे विशेष.तुमसर येथील बोसनगरात गणेश भवन इमारत असून या इमारतीत गत ३५ ते ४० वर्षांपासून ११ दुकाने असून, तुमसर येथील नामवंत जनता कनिष्ठ महाविद्यालय भरत आहे. इमारत मालकाने जीर्ण इमारत असल्याचे सांगून दुकानदार व शाळा प्रशासनाला बाहेर काढण्याकरिता कट कारस्थान रचले आहे. वास्तविक ही इमारत मालकाने बिल्डरांना विक्री केली आहे. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे सांगण्यात येते. नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट हा शासनमान्य स्वतंत्र एजन्सीद्वारे करण्यात यावा, असे निर्देश आहेत. परंतु त्यांनी उद्देशाला येथे डावलण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी तहसीलदार यांनी ११ दुकानदार व शाळा प्रशासनाची सुनावणी घेतली होती. या सुनावणीत दुकानदार व शाळा प्रशासनाने सविस्तर माहिती दिली. परंतु त्या उपरांतही उपविभागीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन हेतुपुरस्सर कारवाई केली. गणेश भवन इमारतीमधील ११ दुकानदारांनी  न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी एका दुकानदाराला संपूर्ण गणेश भवन इमारतीचा  न्यायालयाने “स्टे” दिला आहे. त्यामुळे प्रशासन आता कोणती कारवाई करते याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना, विद्यार्थी व ११ दुकानदार आंदोलन करणार- उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी दिलेला आदेश हा अन्याय करणारा असून, केवळ २० तासांत दुकाने व शाळा कशी कमी करावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ३५९ इतकी आहे. शाळा भुईसपाट केल्यास विद्यार्थ्यांचे वर्ग  कुठे भरतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. गणेश भवन इमारत भुईसपाट केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना, आजी-माजी विद्यार्थी व दुकानदारांनी दिला आहे. 

शाळेची इमारत ही मजबूत असून इमारत मालकाने बिल्डरला विकली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्यपणे येथे कारवाई केली जात आहे. याचा शिवसेना तीव्र निषेध करीत असून शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.-अमित मेश्राम,  शिवसेना विभागप्रमुख, तुमसर. गणेश भवन इमारत भुईसपाट करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे निर्णय घेतला. केवळ वीस तासांत दुकाने कशी कमी करावी, आमचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट देण्याची गरज होती. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलन करण्यात येईल. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे.-डॉ. चंद्रशेखर भोयर,  अध्यक्ष, गणेश भवन बचाव संघर्ष समिती, तुमसर

 

टॅग्स :agitationआंदोलन