शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा
By Admin | Updated: July 17, 2014 23:56 IST2014-07-17T23:56:02+5:302014-07-17T23:56:02+5:30
लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट, सखीमंच व रेवाबेन मनोहरभाई पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील आर.एम. पटेल महाविद्यालयात शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा
भंडारा : लोकमत बालविकास मंच, युवा नेक्स्ट, सखीमंच व रेवाबेन मनोहरभाई पटेल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी दुपारी १२ वाजतापासून येथील आर.एम. पटेल महाविद्यालयात शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मंच सदस्य असणाऱ्या सदस्यांना नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल.
केजी टू पीजी स्कॉलरशिप कार्यक्रमाअंतर्गत एकूण २०० विविध खाजगी, सरकारी स्कॉलरशिपबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्टेट, सीबीएससी पॅटर्न शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थाचे विद्यार्थी, युवक, युवती, महिला सखी व पालक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
शासकीय, निमशासकीय, खासगी विविध संस्था, ट्रस्ट व कंपनी व विदेशातील सर्वच शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन या कार्यशाळेद्वारे देण्यात येईल.
आज शिष्यवृत्तीच्या माहितीअभावी विद्यार्थी लाखो रुपयांच्या फायद्यापासून वंचित राहतो. गरजू व गुणवंत विद्यार्थी आपल्या परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. केजी पासून पुढे पदवीपर्यंतचे व विदेशात शिक्षण घेण्यापर्यंतचे संपूर्ण शिक्षण नि:शुल्क होऊ शकते अशा सर्व योजनांची माहिती मार्गदर्शनात देण्यात येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीमध्ये किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना १० वी, १२ वी, इंजिनिअरिंग, मेडीसीन इत्यादीकरीता महिन्याला ५ ते ८ हजार निधी दिला जातो तसेच विविध खासगी कंपनीकडून पदवीनंतरच्या विदेशात शिक्षणाकरीता १ लाख ते ८ लाख रुपये मिळतात. अशा २०० पेक्षा अधिक योजनांची माहिती महागड्या शिक्षणाला पर्याय होऊ शकतो. कार्यशाळेत विषयाचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदस्यांना नि:शुल्क तर इतरांना २० रुपये शुल्क आकारण्यात येईल. प्रथम ३०० येणाऱ्यास प्रवेश देण्यात येईल.
माहितीकरीता युवा नेक्स्ट संयोजिका ग्रिष्मा खोत (८९२८९६९३८२), सखीमंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) व कार्यक्रम संयोजक (९०९६०१७६७७) यांच्याशीे संपर्क साधता येईल. (मंच प्रतिनिधी)