शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत गॅसचा तुटवडा

By admin | Updated: August 21, 2014 23:38 IST

तालुक्यात इंडेन गॅसची एजंसी आहे. या माध्यमातून सुमारे २० हजार गॅस धारकांना आठवड्याला एक हजार ५०० सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने

पवनी : तालुक्यात इंडेन गॅसची एजंसी आहे. या माध्यमातून सुमारे २० हजार गॅस धारकांना आठवड्याला एक हजार ५०० सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो. मात्र ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पवनी शहरात गॅस वितरणाची एकमेव एजंसी आहे. या एजंसीला नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुका, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील साठगाव, कोल्हारी या गावातील ग्राहकांनाही सिलिंडर वितरीत करावे लागते. सुमारे २० हजार गॅसधारक या एजन्सीचे ग्राहक आहेत. दरदिवशी ६०० सिलिंडरची गरज असताना एजंसीमध्ये सिलिंडरचा तुटवडा असतो. पवनी लगत उमरेड-कऱ्हांडला-पवनी हा अभयारण्य तयार झाल्यामुळे येथील जंगलात सरपण गोळा करण्याकरीता महिलांना प्रवेश बंदी घातली आहे. वनविभागाकडून विक्री करीता लाकडे उपलब्ध होत नसल्याने परिसरातील जनतेला स्वयंपाकाकरीता लहान-मोठ्या समारंभासाठी लाकडांची गरज भासते. मात्र वनविभागाच्या कायद्याच्या कचाट्यात सरपण गोळा करणे आता जोखमीचे झाले आहे. त्यामुळे अनेकांनी गॅस एजंसीचे जोडणी घेतले आहे. मागील दिवसात अड्याळ येथे गॅस एजंसी देण्याऐवजी निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु अजुनही तेथील एजंसी सुरू झाली नाही. अड्याळ व पवनी परिसरात नव्याने एजंसी देवून ग्राहकांचा गॅस सिलिंडरचा तुटवडा बंद करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)