शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

सावित्रीबाई स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या

By admin | Updated: January 6, 2016 00:48 IST

शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करीत मान अपमानाची पर्वा न करता सावित्री आईने त्या प्रतिकुल परिस्थितीतही अतुलनीय कार्य केले आहे.

सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रम : अरुणा सबाने यांचे प्रतिपादन, महापुरूषांचे आदर्श जोपासण्याची गरजभंडारा : शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करीत मान अपमानाची पर्वा न करता सावित्री आईने त्या प्रतिकुल परिस्थितीतही अतुलनीय कार्य केले आहे. चूल आणि मूल ही पारंपारिक विचार सरणी झटकून, दिन दुबळ्यांचे संसार थाटण्यासाठी महात्मा फुले यांनी समाज परिवर्तनाचा प्रवाह उलट दिशेने जी क्रांती केली त्यांचे श्रेय सावित्रीबार्इंना जाते. त्या आद्य शिक्षिका व महाराष्ट्राच्या स्त्री मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आहेत, असे मौलिक विचार ख्यातनाम लेखिका अरुणा सबाने यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती भंडाराद्वारा सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात ३ जानेवारी रोजी आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन समारोह व लोकसेवावृत्ती जोपासणारे निळकंठराव धुर्वे यांच्या सत्कार समारंभ या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या.प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. अनिल नितनवरे, अमृत बन्सोड व महेंद्र गडकरी यांची उपस्थित होती. अरुणा सबाने म्हणाल्या, सावित्रीबाईच्या नातीने पुण्याच्या रस्त्यावर भिख मागणे, अण्णाभाऊ साठे यांच्या मुलांचीही तशीच अवस्था होेणे या अवस्थ करणाऱ्या बाबी पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही. स्त्रीयांवरील वाढत्या गंभीर अत्याचाराविषयी त्यांनी चिंता प्रगट केली. धुर्वे महाजन यांच्या कार्याचा गौरव करून सावित्रीबाई या सर्व शिक्षा अभियानाच्या खऱ्या जननी असल्याचे सांगत प्रा. डॉ. अनिल नितनवरे म्हणाले की, सावित्रीआर्इंचे कार्य म्हणजे सामाजिक व साहित्यीक क्षेत्रातील क्रांतीच होय. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा या निव्वळ दोन व्यक्तींची वा ज्योतींची जोडी नव्हे तर दोन मशालींची जोडी आहे. घरात वाढणाऱ्या अन्यायाच्या विरोधात क्रांती व प्रबोधनाचे अविरत कार्य केले. अमृत बन्सोड म्हणाले, सावित्रीबाईने १५० वर्षापुर्वी अपमान सहन केला म्हणून आजच्या स्त्रीया फुले झेलत आहेत. सत्कारमुर्ती यांच्याबाबत ते म्हणाले, विद्यार्थी दशेतच १९६० मध्ये शाळेची स्थापना करून स्वत:च्या शेतात शाळेची इमारत तयार केली व ग्रामीण विद्यार्थ्याकरीता शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. परंतु शाळेच्या इमारतीचे शासनाकडून एकही पैसाही भाडे न घेणारे ते एकमेव संस्थापक होय. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक लोकोपयोगी व सामाजपयोगी कार्य सेवावृत्तीने केली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कर्मचोगी होत. महेंद्र गडकरी म्हणाले, सावित्रीबाईच्या अवलौकीक कार्याबद्दल प्रत्येक भारतीय स्त्रीने कृतज्ञता बाळगायला पाहिजे. सत्कारमूर्ती निळकंठराव धुर्वे महाजन व त्यांची पत्नी प्रतिभा धुर्वे यांचा सपत्नीक शाल, मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून अरुणा सबाने, महेंद्र गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती धुर्वे म्हणाले, सत्कार करण्यासारखे मी काहीही केले नाही. जी काही अल्पस्वल्प मी सेवा केली ते माझे कर्तव्य व समाज ऋण होते. याप्रसंगी विविध व्यक्ती व संघटनेतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी, डॉ. अनंत कळसे याचे संदेश वाचन प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी तर मानपत्राचे वाचन सुभंत रहाटे यांनी केले. प्रास्ताविक डी.एफ. कोचे यांनी केले व आभार गुलशन गजभिये यांनी मानले.कार्यक्रमासाठी डी.एफ. कोचे, गुलशन गजभिये, माया उके, भाविका उके, इंजि. रूपचंद रामटेके, संजय बन्सोड, असित बागडे, एम.डब्ल्यु. दहिवले, आदिनाथ नागदेवे, महादेव मेश्राम, सुभंत रहाटे, करण रामटेके, माणिकराव रामटेके, डॉ. के.एल. देशपांडे, बळीराम सार्वे, प्रा. विनोद मेश्राम, नरेंद्र बन्सोड, प्रा. अर्जुन गोडबोले, प्रा. मोरेश्वर गेडाम, प्रा. सुधाकर साठवणे, लता करवाडे, अरुण अंबादे, एम.आर. राऊत, गोवर्धन चौबे, प्रताप पवार, प्रशांत बडोले, सी.एम. बागडे, परवेश यादव, प्रा. देवेंद्र सोनटक्के, डॉ. भैय्यालाल गजभिये, आनंद गजभिये, वर्षा गोस्वामी, दिप्ती बन्सोड इत्यादींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)