सावित्रीबाई स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या

By Admin | Updated: January 6, 2016 00:48 IST2016-01-06T00:48:59+5:302016-01-06T00:48:59+5:30

शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करीत मान अपमानाची पर्वा न करता सावित्री आईने त्या प्रतिकुल परिस्थितीतही अतुलनीय कार्य केले आहे.

Savitribai's pioneering role in women's liberation movement | सावित्रीबाई स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या

सावित्रीबाई स्त्री-मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या

सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रम : अरुणा सबाने यांचे प्रतिपादन, महापुरूषांचे आदर्श जोपासण्याची गरज
भंडारा : शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करीत मान अपमानाची पर्वा न करता सावित्री आईने त्या प्रतिकुल परिस्थितीतही अतुलनीय कार्य केले आहे. चूल आणि मूल ही पारंपारिक विचार सरणी झटकून, दिन दुबळ्यांचे संसार थाटण्यासाठी महात्मा फुले यांनी समाज परिवर्तनाचा प्रवाह उलट दिशेने जी क्रांती केली त्यांचे श्रेय सावित्रीबार्इंना जाते. त्या आद्य शिक्षिका व महाराष्ट्राच्या स्त्री मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या आहेत, असे मौलिक विचार ख्यातनाम लेखिका अरुणा सबाने यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती भंडाराद्वारा सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात ३ जानेवारी रोजी आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिन समारोह व लोकसेवावृत्ती जोपासणारे निळकंठराव धुर्वे यांच्या सत्कार समारंभ या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. अनिल नितनवरे, अमृत बन्सोड व महेंद्र गडकरी यांची उपस्थित होती. अरुणा सबाने म्हणाल्या, सावित्रीबाईच्या नातीने पुण्याच्या रस्त्यावर भिख मागणे, अण्णाभाऊ साठे यांच्या मुलांचीही तशीच अवस्था होेणे या अवस्थ करणाऱ्या बाबी पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही. स्त्रीयांवरील वाढत्या गंभीर अत्याचाराविषयी त्यांनी चिंता प्रगट केली.
धुर्वे महाजन यांच्या कार्याचा गौरव करून सावित्रीबाई या सर्व शिक्षा अभियानाच्या खऱ्या जननी असल्याचे सांगत प्रा. डॉ. अनिल नितनवरे म्हणाले की, सावित्रीआर्इंचे कार्य म्हणजे सामाजिक व साहित्यीक क्षेत्रातील क्रांतीच होय. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा या निव्वळ दोन व्यक्तींची वा ज्योतींची जोडी नव्हे तर दोन मशालींची जोडी आहे. घरात वाढणाऱ्या अन्यायाच्या विरोधात क्रांती व प्रबोधनाचे अविरत कार्य केले.
अमृत बन्सोड म्हणाले, सावित्रीबाईने १५० वर्षापुर्वी अपमान सहन केला म्हणून आजच्या स्त्रीया फुले झेलत आहेत. सत्कारमुर्ती यांच्याबाबत ते म्हणाले, विद्यार्थी दशेतच १९६० मध्ये शाळेची स्थापना करून स्वत:च्या शेतात शाळेची इमारत तयार केली व ग्रामीण विद्यार्थ्याकरीता शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. परंतु शाळेच्या इमारतीचे शासनाकडून एकही पैसाही भाडे न घेणारे ते एकमेव संस्थापक होय. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक लोकोपयोगी व सामाजपयोगी कार्य सेवावृत्तीने केली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कर्मचोगी होत.
महेंद्र गडकरी म्हणाले, सावित्रीबाईच्या अवलौकीक कार्याबद्दल प्रत्येक भारतीय स्त्रीने कृतज्ञता बाळगायला पाहिजे. सत्कारमूर्ती निळकंठराव धुर्वे महाजन व त्यांची पत्नी प्रतिभा धुर्वे यांचा सपत्नीक शाल, मानपत्र, स्मृतीचिन्ह देवून अरुणा सबाने, महेंद्र गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती धुर्वे म्हणाले, सत्कार करण्यासारखे मी काहीही केले नाही. जी काही अल्पस्वल्प मी सेवा केली ते माझे कर्तव्य व समाज ऋण होते. याप्रसंगी विविध व्यक्ती व संघटनेतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी, डॉ. अनंत कळसे याचे संदेश वाचन प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी तर मानपत्राचे वाचन सुभंत रहाटे यांनी केले.
प्रास्ताविक डी.एफ. कोचे यांनी केले व आभार गुलशन गजभिये यांनी मानले.
कार्यक्रमासाठी डी.एफ. कोचे, गुलशन गजभिये, माया उके, भाविका उके, इंजि. रूपचंद रामटेके, संजय बन्सोड, असित बागडे, एम.डब्ल्यु. दहिवले, आदिनाथ नागदेवे, महादेव मेश्राम, सुभंत रहाटे, करण रामटेके, माणिकराव रामटेके, डॉ. के.एल. देशपांडे, बळीराम सार्वे, प्रा. विनोद मेश्राम, नरेंद्र बन्सोड, प्रा. अर्जुन गोडबोले, प्रा. मोरेश्वर गेडाम, प्रा. सुधाकर साठवणे, लता करवाडे, अरुण अंबादे, एम.आर. राऊत, गोवर्धन चौबे, प्रताप पवार, प्रशांत बडोले, सी.एम. बागडे, परवेश यादव, प्रा. देवेंद्र सोनटक्के, डॉ. भैय्यालाल गजभिये, आनंद गजभिये, वर्षा गोस्वामी, दिप्ती बन्सोड इत्यादींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Savitribai's pioneering role in women's liberation movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.