सातपुडा पर्वत रांगांनी परिधान केला हिरवा शालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:01 IST2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:12+5:30
सातपुडा पर्वत रांगा व त्यातील तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील जंगल सध्या हिरवेगाव झाले आहे. चांदपूर येथील हनुमान मंदिर टेकडीवर वसले आहे. शनिवारी येथे मोठी गर्दी पाहावयास मिळत होती. जवळच चांदपूरचा तलाव निसर्गप्रेमीकरीता आकर्षनाचा मुख्य केंद्र राहत असे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पर्यटकांनी याकडे पाठ फिरविली आहे.

सातपुडा पर्वत रांगांनी परिधान केला हिरवा शालू
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात गत चार दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत असल्यने सातपुडा पर्वत रागांनी हिरवा शालू परिधान केला आहे. टेकड्या, रस्त्याशेजारील लहान मोठी झाडे हिरवीगार झाली आहेत. तलाव, नाले भरल्याचे सुखावह चित्र आहे. कोरोनाचे भूत मानगुटीवर बसल्याने निसर्ग सौंदर्याचा सुखद अनुभव घेण्याकरिता मात्र कुणी भटकतांना दिसत नाही. कोरोनाचा भूत मुनगुटीवर बसल्याने निसर्ग सौंदर्याचा आस्वाद नागरिकांना घेता येत नाही.
सातपुडा पर्वत रांगा व त्यातील तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील जंगल सध्या हिरवेगाव झाले आहे. चांदपूर येथील हनुमान मंदिर टेकडीवर वसले आहे. शनिवारी येथे मोठी गर्दी पाहावयास मिळत होती.
जवळच चांदपूरचा तलाव निसर्गप्रेमीकरीता आकर्षनाचा मुख्य केंद्र राहत असे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पर्यटकांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये निराशा असली तरी कोरोना संकटकाळात पर्यटकांनी पर्यटनस्थळाला भेट देण्याचे टाळणे गरजेचे आहे.
घनदाट जंगलात वन्यप्राण्यांचे वास्तव्य
तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रात बिबट्या, काळवीट, हरिण, ससे, मोर, रानकुत्रे, रानकोंबडे आदी वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. सुमारे ३५ किमीचे घनदाट जंगल आहे.
दुर्मिळ वनौषधी
येथील जंगलात दुर्मिळ अशी वनऔषधी आहे, परंतु त्यावर येथे औषध निर्मिती केंद्र अद्याप सुरु झाले नाही. अभ्यासकांना जंगल कायम उपेक्षीत आहे.
धरण परिसरात पर्यटनास संधी
सितेकसा येथे आंतरराज्यीय बावनथडी धरण आहे. पावसाळ्यात शेकडो पर्यटक येथे भेटी देतात. जंगलातून जाणारा रस्ता जंगल सफारीची आठवण करुन देतो, पंरतु सध्या सदर स्थळ ओस पडले आहे. धरण पुर्णत्वानंतर येथे संबंधित विभाग तथा एमटीडीसीने सोयी सुविधा निर्माण केल्या नाहीत. मध्यप्रदेशातील पर्यटकही येथे येतात. नागपूर जिल्ह्याच्या सीमा लागून असल्याने तेथील पर्यटकांची संख्याही मोठी असते.
आंबागड किल्लाही दुर्लक्षित
सातपुडा पर्वत रांगात प्रमुख किल्ला म्हणून आंबागड येथील गडकिल्ल्याचा उल्लेख करता येईल. वैभवाची साक्ष देणारा हा किल्ला असून किल्ल्याच्या मागे व विस्तीर्ण तलाव आहे. किल्ला आकर्षक असून इतिहासाचे अभ्यासक येथे येतात. राज्य शासनाने किल्ल्याच्या विकासाकरिता निधी दिली, परंतु किल्लाचा विकास झाला नाही. मोजकेच पर्यटक येथे जातात गड किल्ल्याच्या विकासाकरिता राज्य शासनाने येथे आजपर्यंत गंभीर दखल घेतली नाही.