महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उमरीत श्रमसंस्कार
By Admin | Updated: January 17, 2016 00:30 IST2016-01-17T00:30:52+5:302016-01-17T00:30:52+5:30
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे व समाजात स्वच्छतेविषयी जागरुकता व्हावी, याकरिता गांधी विद्यालय विरली खंदारकडून ...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे उमरीत श्रमसंस्कार
विरलीच्या गांधी विद्यालयाचा उपक्रम : उमरी येथील ग्रामस्थांचाही सहभाग
भंडारा : विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे व समाजात स्वच्छतेविषयी जागरुकता व्हावी, याकरिता गांधी विद्यालय विरली खंदारकडून उमरी येथे ग्राम स्वच्छता अभियान व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव स्वच्छ केल्यानंतर गावांमधून स्वच्छता दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी संत गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मॉ जीजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आदीच्या वेशभुषेत गावात मिरवणूक काढण्यात आली. भजनाच्या संगतीने तसेच स्वच्छतेचे जयघोष, ढोल, लेझीम नृत्याच्या तालात काढलेल्या निवणूकीमध्ये गावातील पुरुष, स्त्रिया व बालक-बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वच्छता दिंडीनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच शिला चौधरी यांचे हस्ते व उपसरपंच भाऊराव चौधरी, मुख्याध्यापक व्ही. डी. नंदनवार, संस्था विश्वस्त नरेश जिभकाटे, राजुजी गेडेकर, प्रा. शरद भुरे, पोलीस पाटील श्रीहरी गेडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विश्वनाथ शिउरकर, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष केशव गेडेकर, ग्रामसचिव लांजेवार यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. स्वच्छतेवर आधारित नाटीका, विविध प्रकारचे नृत्य व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक देवानंद चेटुले यांनी तर आभार एच. आर. दामले यांनी मानले. संचालन दिनेश फंदे यांनी केले. कार्यक्रमासाठी स्नेहलता मोटघरे, सुधिर बुराडे, सुनंदा बांगडकर, मडावी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)