भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात सॅनफ्लॅग कामगार ठार, चालक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 10:56 AM2022-05-16T10:56:20+5:302022-05-16T11:08:55+5:30

याप्रकरणी चालकाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Sanflag worker killed, driver injured in truck collision | भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात सॅनफ्लॅग कामगार ठार, चालक जखमी 

भरधाव ट्रकची कारला धडक; अपघातात सॅनफ्लॅग कामगार ठार, चालक जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देभंडारा-तुमसर मार्गावरील

वरठी (भंडारा) : सिरसी फाट्याजवळ भरधाव अज्ञात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात कारचालक थोडक्यात बचावला तर बाजूला बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली. 

रमेश टंडन (५०) मृत व्यक्तीचे नाव असून युवराज भुरे (४८) जखमी कार चालकाचे नाव आहे. दोघेही सॅनफ्लॅग कंपनीत कामगार असून काळ सायंकाळी ते कामानिमित्त भंडारा येथे गेले होते. काम आटोपून परत वरठीला येत असताना सिरसी फाट्याजवळ अज्ञात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात कारचा अक्षरशः चुराडा झाला. रमेश टंडन याचा घटनास्थळीच मृत्य झाला असून चालकला किरकोळ मार लागला आहे. जखमी चालकाला तत्काळ नागपूरला हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तत्काळ रुग्णालयात हलवून मृतदेह शासकीय रुग्णालय भंडारा येथे रवाना केले. याप्रकरणी चालकाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Sanflag worker killed, driver injured in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.