महसूल अधिकाऱ्यांना धडक देत रेतीचा ट्रक पसार; ८ ब्रास वाळू पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 19:06 IST2026-04-05T19:02:52+5:302026-04-05T19:06:48+5:30

यावेळी पहेला–पवनी मुख्य मार्गावरील नाल्याजवळ त्यांना ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ५१७५ हा विनापरवाना सुमारे ८ ब्रास रेती वाहतूक करताना आढळून आला.

Sand truck rams into revenue officials; 8 tons of sand seized | महसूल अधिकाऱ्यांना धडक देत रेतीचा ट्रक पसार; ८ ब्रास वाळू पकडली

महसूल अधिकाऱ्यांना धडक देत रेतीचा ट्रक पसार; ८ ब्रास वाळू पकडली

अड्याळ (भंडारा) : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करीत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धडक देत ट्रक पळवून नेल्याची धक्कादायक घटना पवनी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. माहितीनुसार, मंडळ अधिकारी पृथ्वीराज विठ्ठल अहिर (४७) हे महसूल सेवक अमित बावणकर यांच्यासह ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोलेवाडी येथे शासकीय कामासाठी जात होते. यावेळी पहेला–पवनी मुख्य मार्गावरील नाल्याजवळ त्यांना ट्रक क्रमांक एमएच ४० बीजी ५१७५ हा विनापरवाना सुमारे ८ ब्रास रेती वाहतूक करताना आढळून आला.

ट्रकला थांबवून कारवाई सुरू असताना ट्रक मालक चारचाकी वाहनाने घटनास्थळी आला व अधिकाऱ्यांशी वाद घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर ट्रक घटनास्थळावरून पळवून नेला. फिर्यादी यांनी पाठलाग केला असता ट्रक चालकाने मंडळ अधिकारी यांच्या कारला धडक दिली. या घटनेत वाहनाचे नुकसान झाले.

या प्रकरणी ट्रक मालक शुभम राजेंद्र जीभकाटे (२७, रा. वलनी) व चालक अनंता शिवशंकर सावरबांधे (२०, रा. सिरसाळा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी कारवाई सुरू असून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,असे पोलिसांनी स्पष्ट केले. तपास पोलीस हवालदार सुखदेव पेंदाम करीत आहेत.

Web Title : रेती ट्रक राजस्व अधिकारियों को टक्कर मारकर फरार; 8 ब्रास रेत जब्त।

Web Summary : भंडारा के पवनी में रेत से भरे ट्रक ने राजस्व अधिकारियों पर हमला किया और भाग गया। पुलिस ने 8 ब्रास रेत जब्त की और सरकारी कर्मचारियों को बाधित करने के आरोप में मालिक और ड्राइवर के खिलाफ मामला दर्ज कर संदिग्धों की तलाश शुरू कर दी है।

Web Title : Sand truck flees, hitting revenue officers; 8 brass sand seized.

Web Summary : A sand truck driver assaulted revenue officers in Pawni, Bhandara, while fleeing with illegal sand. Police seized 8 brass of sand and have launched a search for the suspects after registering a case against the owner and driver for obstructing public servants.