अधिक व्याजाचे आमिष देऊन ७२ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 05:00 AM2022-06-04T05:00:00+5:302022-06-04T05:00:52+5:30

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन झाल्याने आणखी रक्कम गुंतविली. रेणूबाई सुवालाल ठाकरे १रा. चिंचोली ता. तुमसर) यांच्यासह सुमारे ५० जणांनी रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. दीड वर्षांपूर्वी अचानक कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळेजवळ असलेले कार्यालय बंद केले. एजंटांच्या माध्यमातून पैसा गुंतवणाऱ्यांनी प्रथम एजंटांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांनी हात वर केले. या कंपनीने ७२ लाख २० हजार २९७ रुपयांची आवर्ती ठेव व मुदत ठेव स्वरूपात फसवणूक केल्याचे पुढे आले.

Rs 72 lakh bribe by luring more interest | अधिक व्याजाचे आमिष देऊन ७२ लाखांचा गंडा

अधिक व्याजाचे आमिष देऊन ७२ लाखांचा गंडा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अधिक व्याजाचे आमिष दाखवून  गुंतवणूकदारांची फसवणूक करून ७२ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार तुमसर तालुक्यात उघडकीस आला आहे. भाेपाळच्या तनिष्क इन्फ्रा इस्टेट कंपनीने सुमारे ५० जणांची फसवणूक केली असून याप्रकरणी तुमसर ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
देवेंद्र पूनमचंद जायस्वाल (२९), सुनीता देवेंद्र जयस्वाल (२९), दिनेश वर्मा (४०, तिघे राहणार खिचीपूर मध्यप्रदेश), विनोद बळिराम कुर्वे (३५, रा. बोंनकट्टा ता. तिरोडी, जि. बालाघाट), पन्नालाल रूपचंद उपवनशी (४५, रा. पिपरटोला, ता. गोंदिया), मोहन सुकराम मुटकुरे, (४०, रा. वेलकम कॉलनी, भंडारा), चंद्रशेखर शंकरराव बावनकुळे (४५, रा. सुभाष वाॅर्ड, भंडारा), अशोक सोनी (३५, रा. बोंनकट्टा, ता. तिरोडी, जि. बालाघाट) अशी आरोपींची नावे आहेत. त्याच्याविरुद्ध भांदवी ४२०, ४०६, ४०९, ३४, सहा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तनिष्क इन्फ्रा इस्टेट लिमिटेड, ३१७ आकांक्षा प्रेस कॉम्प्लेक्स झोन १, एमपीनगर भोपाल या नावाने कंपनी स्थापन करण्यात आली होती. तुमसर तालुक्यात या कंपनीने अधिक व्याजाचे आमिष देत अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. अनेकांनी या कंपनीमध्ये पैसे गुंतविले. गुंतवणूक केलेल्या पैशांची काही काळापर्यंत कंपनीने परतफेड केली. त्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन झाल्याने आणखी रक्कम गुंतविली. रेणूबाई सुवालाल ठाकरे १रा. चिंचोली ता. तुमसर) यांच्यासह सुमारे ५० जणांनी रक्कम गुंतविली. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले. दीड वर्षांपूर्वी अचानक कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळेजवळ असलेले कार्यालय बंद केले. एजंटांच्या माध्यमातून पैसा गुंतवणाऱ्यांनी प्रथम एजंटांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांनी हात वर केले. या कंपनीने ७२ लाख २० हजार २९७ रुपयांची आवर्ती ठेव व मुदत ठेव स्वरूपात फसवणूक केल्याचे पुढे आले. अखेर बुधवारी या प्रकरणी रेणूबाई ठाकरे यांनी तक्रार दाखल केली. 

एजंटांच्या माध्यमातून दाखविले आमिष
- स्थानिक एजंटांच्या माध्यमातून या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना अधिक व्याजाचे आमिष दाखवले. तुमसर, चिचोली व तिरोडा येथील तीन एजंटांनी सुमारे ५० गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा केला होता. २०१५ पासून रक्कम जमा करण्यात येत हाती. मात्र, आता त्यांची फसवणूक झाली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर करत आहेत.

दीड वर्षापूर्वीच गुंडाळले तुमसरचे कार्यालय
- भाेपाळ येथील तनिष्क इन्फ्रा इस्टेट लिमिटेड या कंपनीने तुमसर येथील सिंधी धर्मशाळेजवळ कार्यालय थाटले हाेते. दीड वर्षापुर्वीच कार्यालय गुंडाळून कंपनीने पाेबारा केला हाेता. मात्र आपले पैसे मिळतील या आशेने फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रार केली नाही. मात्र आता तक्रार दाखल केली.

 

Web Title: Rs 72 lakh bribe by luring more interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.