पाच कोटींचा मदतनिधी झाला शासनजमा

By Admin | Updated: March 14, 2015 00:52 IST2015-03-14T00:52:02+5:302015-03-14T00:52:02+5:30

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ३६ हजार ६९१ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत १२ कोटी १९ लाख ४० हजार उपलब्ध निधीतून ३५ हजार २६ शेतकऱ्यांना ११ कोटी ६८ लाख ६ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले.

Rs 5 crore aid was given to the government | पाच कोटींचा मदतनिधी झाला शासनजमा

पाच कोटींचा मदतनिधी झाला शासनजमा

देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ३६ हजार ६९१ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत १२ कोटी १९ लाख ४० हजार उपलब्ध निधीतून ३५ हजार २६ शेतकऱ्यांना ११ कोटी ६८ लाख ६ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले. या मदतीचे वाटप ७ मार्चपर्यंतच होते. खाते क्रमांकाविना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या मदतीची पाच कोटींची रक्कम शनिवारी शासनाकडे परत पाठविण्यात आली.
धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात किडींचा प्रादुर्भाव व निर्सगाच्या अवकृपेमुळे धान उत्पादनात कमालिची घट झाली. त्यानंतरही प्रशासनाने खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५६ पैसे घोषित केलीे. यात १५४ गावांची ५० पैसेपेक्षा कमी दाखविण्यात आलीे. ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या १८.९० कोटी निधीपैकी १६ कोटी ७४ लाख रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलीे.
भंडारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमध्ये जिल्ह्यातील सातपैकी सहा तालुक्यातील दुष्काळग्रस्त ३६ हजार ६९१ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी ९ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ८ कोटी ६५ लाखांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून १२ कोटी २५ लाख ५० हजार ३६ रुपयांचा मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सहा तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम १६ जानेवारी पासून तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत ७ मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची होती; मात्र दुष्काळग्रस्त एक हजार ६६५ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नाही. बँक खाते क्रमांकाविना एक हजार ६६५ हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पाच कोटींवर मदतनिधी ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा करण्यात आला. मदतीचा निधी उपलब्ध असूनही बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने, मदतनिधी शासनजमा करण्याची वेळ महसूल विभागावर आली.
खाते क्रमांक मिळविण्यात अपयश
शासनामार्फत प्राप्त मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. या प्रकरणी जिल्ह्यातील ५ टक्के शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक प्राप्त करण्याच्या कामात तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अपयश आले. त्यामुळे एक हजार ६६५ हजार शेतकऱ्यांची मदतीची रक्कम शासनाकडे परत करण्यात आली.

Web Title: Rs 5 crore aid was given to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.