शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

मोहाडी तालुक्यात २७ हेक्टरमध्ये रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:31 IST

ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो.

ठळक मुद्देपर्जन्य ४९ टक्केच : पावसाचा खंड, रोगाचा प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

राजू बांते ।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ढग येतात अन् तसेच निघून जातात. ढगाकडे बघतच शेतकºयांचा दिवस जातो. मावळतीला हताश चेहºयाने शेतीतून पाय काढतो. जमिनीला भेगा अन् डोक्याचा ताण वाढत जाऊन दिवस उजाडतो तो लख्ख प्रकाशाने. लावल्या रोपाला फुटवे आले. पण संथ वाढ, दुसरीकडे पावसाअभावी जूनमध्ये घातलेली भातरोपे तशीच पडून आहेत. अशी भयाण वास्तव परिस्थिती यावर्षी शेतकºयांच्या नशिबी आली आहे. एकूणच मोहाडी तालुका खरीप पिकाच्या दुष्काळ छायेत दिसून येत आहे.जुलै व आॅगस्ट ही दोन महिने खूप पाऊस देणारी महिने समजली जातात. या दोन महिण्याच्या पावसावर भात पिकाचे भविष्य अवलंबून असते. जून महिन्याचा अगदी शेवटी पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात १९५.८ मिमी. पावसाची सरासरी अपेक्षीत होती. पण ७५.२ मिमी. पाऊस पडला. सर्वात कमी पाऊस कान्हळगाव महसूल मंडळात २६.४ मि.मी. पडला. वरठी मंडळात १५१.२ मि.मी. तर मोहाडी, वरठी, कांद्री, आंधळगाव महसूल मंडळात ५० मिमीच्या वर पाऊस झाला. जुलै महिन्यात २९९.१ मिमी पाऊसाची सरासरी हवी होती. पण, ७४.४ मिमी एवढाच पाऊस झाला. तसेच आॅगस्ट महिन्यात ३९१ मि.मी. सरासरी हवा होता.१६ आॅगस्टपर्यंत केवळ २६.२ मिमी टक्केवारी पावसाने हजेरी लावली. आजपर्यंत पावसाची टक्केवादी ४९.२ मिमी एवढीच आहे. जून महिन्याच्या पावसाने भात नर्सरीची पेरणी दुसºया, तिसºया आठवडयात झाली. त्यानंतर ५ ते १३ जुलै या दरम्यान आठ दिवसाची पावसाने खंड पाडला. रोपांची वाढ खुंटली. १४ ते २० जुलैमध्ये पाऊस झाला. या पावसाने एकाच वेळी शेतकºयांनी रोवणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर पाऊस पडेल अशी आशा होती. कशी तरी शेतकºयांनी ओढून ताणून भात पिकाची लागवड केली. पावसाअभावी मोहाडी, वरठी या मंडळातील रोवणी १ आॅगस्टपासून थांबली आहेत.कान्हळगाव, आंधळगाव, कांद्री, करडी या महसुल मंडळातील रोवणी २९ जुलैपासून खोळंबली आहेत. त्यामुळे आतापर्यंत २६.९७ क्षेत्रातच रोवणी होवु शकली. २९ हजार ४६४ हेक्टर भात पिकाची लागवड होते. पण, फक्त ७ हजार ९३० हेक्टर भागात रोवणी पूर्ण झाली आहे. जून महिन्यापासून भाताची रोपे (पºहे) अजूनही पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. पावसाअभावी रोवणीसाठीची पºहे तशीच उभी आहे. करपले आहेत. भात पिकाची कोरडी जमीन पºहे लावणीसाठी आसूरलेली आहे. पावसाच्या अभावाने कोरड्या जागी पºह्याची रोपण होवू शकली नाही. काही भाताच्या शेतीत गवत उगविले आहे. भाताच्या जागी गवताने जागा घेतली आहे. आॅगस्ट महिन्याचा तपशिलावर दृष्टी घातली तर केवळ चारच दिवस पाऊस पडला. १ ते ४ आॅगस्ट या चार दिवशी पाऊसाचा पत्ता नाही.जो काही पाऊस पडला त्याची १८ आॅगस्टपर्यंतची पावसाच्या पर्जन्यमानाची सरासरी १७.२३ इतकी आहे. १ जुलै ते १६ आॅगस्ट सरासरी ८१३.०२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. मात्र आतापर्यंत सरासरी गाठलीच नाही. कवेळ ४००.५ मिमी पाऊस पडला. सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी ४९.२ आहे. सात तालुक्याूध्ये पाऊस बरसण्यात मोहाडी तालुक्याचा सहावा क्रमांक लागतो. सर्वात जास्त पाऊस १ जून ते १६ आॅगस्टपर्यंत पवनी येथे ७२.२ टक्के, लाखांदूर ६५ टक्के, लाखनी ६२ टक्के , भंडारा ६०.२ टक्के, मोहाडी ४९.२ टक्के तुमसर येथे ४१.६२ टक्के इतका पडला. पावसाचा खरा फटका तुमसर, मोहाडी यांना बसला आहे. या दोन्ही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.गायमुख नदी, सुरनदीच प्रवाह थांबला, धरणात पाणी नाही, तलाव, बोळ्या रिकाम्या आहेत. सिंचन विहिरी खोल गेल्या. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे पण, वीज साथ देत नाही. सिंचनासाठी वीज हवी असणाºया ४६५ शेतकरी वर्षभरापासून शेतपंपाच्या वीज जोडणीची प्रतिक्षा करीत आहेत. दुसरीकडे कर्जमाफीचा चॉकलेट दाखविला गेला. पण, एक दमडीही पदरात पडली नाही. केवळ घोषणाच सुरु आहेत. सातबारा कोरा होणार म्हणणारे नेते शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.सद्या स्थितीत पावसाअभावी ७३.०३ हेक्टर रोवणीचे क्षेत्र पडीत आहे. २६.९७ हेक्टर मधील भातपिकांना पाण्याचा ताण पडलेला आहे. जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. पावसाचा खंड व पाण्याचा ताण यामुळे भात पिकांची वाढ समाधानकारक नाही. भाताच्या पिकाचे फुटवे निघण्याच्या स्थितीत आहेत.२० ते २५ टक्के भात पिकाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातील जानकारांचे मत आहे. भात पिकाची क्षेत्र लागवड कमी, पावसाचा खंड, उत्पन्नात घटीची शक्यता यासोबतच एका नुकसानीची भर पडत आहे. ती रोगाच्या प्रादुर्भावाची भातावर आतपासून करपा व कडाकरपा या रोगाने हल्ला केला आहे. एकूणच चहुबाजूने शेतकरी दुष्काळाच्या चक्रव्युहात सापडला गेला आहे.शासन अन् निसर्ग दोघेही मेहरबान नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. गोधंळाची शेतकºयांपूढे परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाव की मराव ही स्थिती निर्माण झाल्याने ऐन उत्सवात शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसायला लागले आहे.शेतीसाठी नव्या हंगामासाठी काढलेले नवीन कर्ज शेतकºयांच्या डोक्यावर आहे. ही दुष्काळ सदृष्य परिस्थिती जगू ही देत नाही मरुही देत नाही. शासन मात्र शेतकºयांच्या हातावर तुरीच देत आहे.-राजेश लेंडे, सरपंच ग्रामपंचायत मोहगाव/देवी