रस्त्यावर जनावरांचे बस्तान
By Admin | Updated: March 13, 2015 00:46 IST2015-03-13T00:46:08+5:302015-03-13T00:46:08+5:30
सिहोरा परिसरात ग्रामीण भागातील रस्त्यावर मानव निर्मितीचेजनावरांचे बस्तान आहे. यामुळे ये-जा करताना नागरिकांना त्रास होत आहे.

रस्त्यावर जनावरांचे बस्तान
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात ग्रामीण भागातील रस्त्यावर मानव निर्मितीचेजनावरांचे बस्तान आहे. यामुळे ये-जा करताना नागरिकांना त्रास होत आहे.
सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी आहेत. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून जनावरांचे पालन पोषण करण्यात येत आहे. परंतु या जनावरांना थेट रस्त्यावरच बांधण्यात येत असल्याने नागरिकांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिपरी (चुन्ही) गावात जनावरे आणि बैल बंड्या रस्त्यावर ठेवण्यात येत असल्याने चारचाकी वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्त्याच जनावरांच्या अतिक्रमणात असल्याचे दिसून येत आहे. जनावरांचे शेण मोटारसायकल स्वारास अपघाताचे आमंत्रण देत आहेत. याशिवाय रस्त्याच्या कडेला शेण आणि चाऱ्याचे ढिग तयार करण्यात आली आहेत. स्वच्छता अभियानात राबविण्यास मानव निर्मित अडथळा निर्माण होत आहे. जनावरांची सुविधा करण्याची जबाबदारी जनावर मालकांची आहे. जनावरांचे गोठे असताना उपयोग करण्यात येत नाही. यामुळे गावात स्वच्छता प्रभावित होत आहे. जनावरे शेतकऱ् यांना आर्थिक स्त्रोत असल्याचे साधन आहे. जनावरांचे पालन पोषण करण्यास विरोध नाही. परंतु जनावर बांधण्याचे नियोजन चुकीचे आहे. याशिवाय बिनाखी, चुल्हाड गावात हिच स्थिती आहे. बिनाखी गावात रस्त्याने पायदळ चालणे मुश्कील होत आहे. दुतर्फा रस्त्यावर जनावरे बांधली जात आहेत. तिथेच जनावरांना शेण आणि तणसीचा ढिगारा तयार करण्यात येत आहे. या जनावर मालकांना स्वच्छतेत अडथडा निर्माण होत असल्याच्या कारणावरून साधा नोटीस ग्रामपंचायत मार्फत बजावण्यात येत नाही. (वार्ताहर)