गंज बाजारावर तुमसर बाजार समितीचा हक्क

By Admin | Updated: March 4, 2015 01:06 IST2015-03-04T01:06:16+5:302015-03-04T01:06:16+5:30

तुमसर नगरपरिषदेने अतिक्रमण केलेली जून्या गंज बाजार (१२ दारी)

The rights of the market market committee on Ganj market | गंज बाजारावर तुमसर बाजार समितीचा हक्क

गंज बाजारावर तुमसर बाजार समितीचा हक्क

उच्च न्यायालयाचे आदेश : पोलीस संरक्षणात अतिक्रमण काढणार
तुमसर :
तुमसर नगरपरिषदेने अतिक्रमण केलेली जून्या गंज बाजार (१२ दारी) इमारत व परिसरावर आजही तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची माल्की असून तेथील अतिक्रमण पोलिसांच्या संरक्षणात काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा सन १९६३ मध्ये अस्तित्वात आला. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज प्रत्यक्षात सन १९७२ पासून सुरूवात झाली. शासनाचे आदेशाप्रमाणे जूना गंज बाजार (१२ द्वारी) ची ईमारत व जागा खसरा नंबर ७१९/१, ७१९/२, ७४४, ७४५, ७४६ व ७४७ तुमसर बाजार समितीच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील काळात समितीने शेतमाल खरेदी, विक्रीचे व्यवहार तुमसर-खापा रोडवरील जयप्रकाश मार्केट यार्डवर स्थलांतरीत केले, परंतु जुना गंज बाजार १२ दारी ईमारत व जागा समितीच्या कब्जात होती. ही जागा सुरक्षित राहावी म्हणून मार्केटला संरक्षित करण्यात आले होते. नगरपरिषदेने बळजबरीने ही जागा आपले कब्जात घेवून संबंधित दुकानदाराकडून लिज रक्कम, किराया ईत्यादी वसूल करणे, जागेवर तोडफोड व नव्याने अनधिकृत बांधकाम केले. याविरोधात तुमसर कृषि उत्पन्न बाजार समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. यात उच्च न्यायालयाने जून्या गंज बाजारातील सुरू असलेले बांधकाम तथा तोडफोड विरोधात स्थगनादेश दिला. तुमसर नगरपरिषदेने जून्या गंज बाजारातील ५२ दारीचे बांधकाम पाडणे सुरू केले होते. या विरोधात कृषि उत्पन्न बाजार समितीने याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी स्थगनादेश आदेश मंजूर केले.
तुमसर नगरपरिषद या मालमत्तेची मालक नाही. त्यामुळे या जागेवर बांधकाम करावयाचे असल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीची लिखित मंजूरी घ्यावी. भाड्याने दिलेले दुकान, गाळे यांच्याकडून प्राप्त भाड्याचे वेगळे खाते करून ठेवण्यात यावे असे आदेशही उच्च न्यायालयाने तुमसर नगरपरिषदेला दिले. बाजार समितीला शासकीय परिपत्रकानुसार जुन्या गंज बाजारातील जागा देण्यात आली होती. त्यामुळे या जागेकरिता तुमसर नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.
सदर प्रकरण भंडारा न्यायालयाने रद्द केला. या विरोधात तुमसर नगरपरिषदेने भंडारा जिल्हा न्यायालयात अपील केले. अपिल प्रलंबित असतानी नगरपरिषदेने बारा दारीचे बांधकाम पाडायला सुरूवात केली होती. याविरोधात बाजार समितीने बारा दारी बांधकाम तोडफोड प्रकरण थांबविण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बाजार समितीने उच्च न्ययालयात नगरपरिषद विरोधात अवमानना याचिकाही दाखल केली होती. बाजार समितीतर्फे अ‍ॅड. सुभाष पालीवाल, अ‍ॅड. सौमित्र पालीवाल तर नगरपरिषदेतर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली. याबाबतीत तुमसर कृउबाचे सभापती भाऊराव तुमसरे यांनी जुन्या गंज मार्केट परिसरात ज्यांनी अनाधिकृत दुकाने थाटली आहेत. तथा गैरकायदेशिर मालकाकडून केलेली करारनामे रद्द करून रीतसर मालक कृउबा, तुमसरकडून परिस्थिती अवगत करून पुढील कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The rights of the market market committee on Ganj market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.