शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत धान खरेदी केंद्रांवरील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

प्रशासन व धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धान उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना शाखा लाखांदुरच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची पूतर्ता न झाल्यास शेतकरी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : आधारभूत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या समस्यांचे सामना करावा लागत आहे. प्रशासन व धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे धान उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आला आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना शाखा लाखांदुरच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनामध्ये, आधारभूत धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध नसलेला बारदाना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, मिलर्सकडून खरेदी केंद्रांवर मोजनी झालेल्या धानाची उचल करून गोदाम मोकळे करून देण्यात यावे, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली लुट थांबविण्यात यावे, अवकाळी पावसामुळे कुजलेला धान खरेदी करणे, शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या धानाची मोजनी होत असलेला प्रकार थांबविण्यात यावे तसेच मोजनी झालेल्या धानाचे चुकारे गत दोन महिण्यापासून अडल्याने तात्काळ शेतकऱ्यांना चुकारे देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. १० दिवसाच्या आत मागण्यांची पुर्तता करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव एंचीलवार, पंचायत समिती उपसभापती शिवाजी देशकर, चक्रधर ठाकूर, आकाश दखने, अमित मिसार, जितेंद्र ढोरे, जयगोपाल लांडगे, वासुदेव बुराडे, श्रीकांत बोरकर, चंद्रशेखर खेडीकर, मंगेश राऊत, स्वप्निल ठेंगरी, शैंलेंद्र मोटघरे, पवन समरीत आदींचा समावेश होता.

आंधळगाव येथे आधारभूत धान केंद्राचा शुभारंभ
मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव येथील बारई राईस मिलमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन हरदोलीचे सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम बुराडे होते. यावेळी मोहाडी खरेदी विक्री समिती अध्यक्ष माधवराव बांते, खरेदी विक्री समिती सदस्य सुभाष गायधने, कोमल सरोदे, भोजराम शेंडे, लक्ष्मण कारेमोरे, राहुल वानखेडे, नशीब खाँ पठाण आदी उपस्थित होते. आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करावी व शासनाच्या बोनस योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच ढेंगे यांनी केले. धान खरेदी केंद्रासाठी आमदार राजू कारेमोरे यांनी प्रयत्न केले. विधानसभा क्षेत्रात नव्याने धान खरेदी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले आहे. यामुळे आमदार कारेमोरे यांचे शेतकºयांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव बांते, तर आभार प्रदर्शन सुभाष गायधने यांनी केले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड