शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरची दरवाढ एप्रिलमध्ये

By admin | Updated: January 8, 2016 00:28 IST

दरवर्षी नवीन वर्षाला वाढणारे रेडिरेकनरचे दर यंदा 'जैसे थे' आहेत. जानेवारीमध्ये होणारी रेडिरेकनरमधील वाढ आता एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

दिलासा : तीन महिने राहणार जुनेच दरअमरावती : दरवर्षी नवीन वर्षाला वाढणारे रेडिरेकनरचे दर यंदा 'जैसे थे' आहेत. जानेवारीमध्ये होणारी रेडिरेकनरमधील वाढ आता एप्रिलपासून करण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळकती व मोकळ्या जागांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना बसणारा दरवाढीचा फटका मार्चपर्यंत तरी बसणार नाही. गेल्या वर्षी २०१५ जानेवारीमध्ये व्यवहारसंदर्भातील वार्षिक मूल्यदर अर्थात रेडिरेकनरमध्ये १५ टक्के वाढ झाली होती. मुळात रिअल इस्टेट मार्केट तेजीत तरी मंदीचे वातावरण असल्याने बांधकाम व्यावसायिक शांत आहेत. जिल्ह्यात ७ ते ८ हजार फ्लॅट विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रावर सध्यातरी मंदीचे सावट आहे. ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थितीचा खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुद्रांक शुल्क विभाग रेडिरेकनरच्या दरात ५ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ करीत असते. त्यामुळे नवीन वर्षात जमीन, मोकळ्या जागा आणि घरांचे खरेदी-विक्री व्यवहारावर परिणाम होऊन त्याच्या किमती वाढतात. या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे दर वाढल्याने शासनाला स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून जादा महसूल मिळतो. महापालिका क्षेत्रात प्रत्येक भागाचा स्वतंत्र रेडिरेकनरचा दर असतो. त्यामुळे काही जागांचा दर शासकीय दरापेक्षा अधिक राहतो. खुली जागा, निवासा इमारत, वरच्या तसेच तळमजल्यावरील कार्यालय व व्यवसायासाठी हा सुधारित दर लागू असतो. तथापी अजून तीन महिने राज्यात जुन्याच रेडिरेकनरने व्यवहार होणार आहेत. जमीन, प्लॉट, खरेदी-विक्री तसेच रेडिरेकनरच्या दरात वाढ होत असल्याने पर्यायाने स्टॅम्प ड्युटीची रक्कम वाढते. नगरपालिका क्षेत्रात मात्र एक टक्का अधिभार लागू असल्याने तेथे व्यवहारावर एक टक्का अधिक रकमेची आकारणी होते. पण यावर्षी डिसेंबरअखेरीस रेडिरेकनरच्या दरात वाढ झालेली नाही. मुद्रांक शुल्क विभागाने तेच दर मार्चपर्यंत पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जमिनी, फ्लॅटच्या दरात वाढ होणार नाही. गेल्यावर्षीचेच दर तीन महिने राहणार असल्याने गेल्या वर्षीच्याच दराने जागा व फ्लॅट खरेदी करता येणार आहे. (प्रतिनिधी)