भंडारा येथे रापमचा वर्धापन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:32 IST2018-06-03T22:32:29+5:302018-06-03T22:32:29+5:30
राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन भंडारा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा बसस्थानकात झालेल्या समारंभात बसस्थानकाचा परिसर रांगोळी तथा तोरणांनी सजवून आकर्षक बनविण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवून दिली.

भंडारा येथे रापमचा वर्धापन दिन उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन भंडारा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा बसस्थानकात झालेल्या समारंभात बसस्थानकाचा परिसर रांगोळी तथा तोरणांनी सजवून आकर्षक बनविण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवून दिली.
१ जून हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा वर्धापण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भंडारा येथे आयोजित कार्यक्रमात भंडारा विभागाचे विभागप्रमुख विनोदकुमार भालेराव, यंत्र अभियंता (चालन) गजानन नागुलवार, विभागीय लेखा अधिकारी सुरेंद्र वाघधरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी लोणे, कामगार अधिकारी भारती कोसरे, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, बसस्थानक प्रमुख सारीका पु. लिमजे, वाहतुक निरिक्षक सुनिल जिभकाटे यांच्यासह विभागीय कार्यालयातील अधिकारी व भंडारा आगारातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ वृध्द महिला व ज्येष्ठ पुरुष प्रवाशी यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे परिवहनदिनाचे औचित्य साधून एक जून पासून शिवशाहीबसमध्ये ४५ टक्के व शिवशाही स्लिपर बसमध्ये ३० टक्के प्रवास भाड्यात सवलतीची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे आभार आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता रापनिचे अधिकारी तथा कर्मचाºयांनी सहकार्य केले.