जिल्ह्यात रबी पिकांनी सजली शेत-शिवारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:44 AM2020-12-30T04:44:47+5:302020-12-30T04:44:47+5:30

बॉक्स कमी खर्चात पक्षी थांबे उभारा रब्बी हंगामात असणारे प्रमुख पीक हरभरा व गहू, लाखोरी या पिकांवर रोग व ...

Rabi crops in the district | जिल्ह्यात रबी पिकांनी सजली शेत-शिवारे

जिल्ह्यात रबी पिकांनी सजली शेत-शिवारे

Next

बॉक्स

कमी खर्चात पक्षी थांबे उभारा

रब्बी हंगामात असणारे प्रमुख पीक हरभरा व गहू, लाखोरी या पिकांवर रोग व किडींचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आपल्या परिसरात उपलब्ध असलेली सामग्रीचा वापर करुन कमी खर्चात बचत करण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकांमध्ये टी आकाराचे पक्षी थांबे उभारावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लावून कीड नियंत्रण करावे यासाठी कमी खर्चात कीड नियंत्रण करता येते. सध्या तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी दिसून येत आहे. रब्बी हंगाम पिकांची पेरणी आटोपली असून सध्या पिके जोमदार दिसून येत आहेत.

कोट

शेतकऱ्यांनी गहू हरभरा पिकांसाठी तुषार सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा. सध्या रबीची पिके जोमदार आहेत. हरभरा पिकावर निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी यासोबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.

मिलिंद लाड,

उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा

कोट

जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृषी सहाय्यकांमार्फत कीडरोग नियंत्रण मोहिम राबवली जात असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी,महाआयटी मार्फत ३१ डिसेंबरपूर्वी अर्ज करावेत याबद्दलच्या मार्गदर्शनासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी.

हिंदूराव चव्हाण,जिल्हा कृषी अधिक्षक,भंडारा २९ लोक ०३ के

Web Title: Rabi crops in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.