पुरूषोत्तमचा विश्वविक्रम

By Admin | Updated: May 3, 2017 00:38 IST2017-05-03T00:38:59+5:302017-05-03T00:38:59+5:30

श्री बहिरंगेश्वर व्यायाम शाळा भंडारा येथील पुरूषोत्तम चौधरी यांनी भारतीय दंड इंडियन पुशअप या व्यायाम प्रकारात नवा विश्वविक्रम प्रस्थापीत केला आहे.

Purushottam's world record | पुरूषोत्तमचा विश्वविक्रम

पुरूषोत्तमचा विश्वविक्रम

भंडारा : श्री बहिरंगेश्वर व्यायाम शाळा भंडारा येथील पुरूषोत्तम चौधरी यांनी भारतीय दंड इंडियन पुशअप या व्यायाम प्रकारात नवा विश्वविक्रम प्रस्थापीत केला आहे. दीड तासात १९५० इंडियन पुशअप मारण्याचा हा विश्वविक्रम लवकर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंदविला जाणार आहे.
मेहनत व जिद्दीच्या जोरावर पुरूषोत्तम चौधरी यांनी यापूर्वी एक तासात १४८० इंडियन पुशअप मारून लिम्का बुक आॅफ नॅशनल रेकॉर्डमध्ये नवा किर्तीमान स्थापन केला होता. भंडारा जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर व्हावे यासाठी पुरूषोत्तम चौधरी यांनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. २७ एप्रिलला शेकडो क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीत बहिरंगेश्वर व्यायामशाळा भंडारा येथे पहाटे ५ वाजून १६ मिनिटांनी चौधरी यांनी मार्गदर्शक गोपाळराव हलमारे यांचा आशिर्वाद घेवून पुशुअप मारायला सुरूवात केली. ६ वाजून ५१ मिनिटात त्यांनी १९५० इंडियन पुशअप मारून एक नवा विश्वविक्रम घडविला. या दरम्यान त्यांनी एक तासानंतर ५ मिनिटांची विश्रांती घेतली होती. त्याने क्रीडापेमींनी एकच जल्लोष केला. यावेळी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, न.प.चे उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, व्यायामशाळेचे सचिव गोपाळराव हलमारे, अध्यक्ष अ‍ॅड. अनंत गुप्ते, उपाध्यक्ष निलकंठ रणदिवे, अ‍ॅड. मोहन भिवगडे, अ‍ॅड. खराबे, सहसचिव नरेश आंबिलकर, कोषाध्यक्ष लक्ष्मण सोनकुसरे, मधुकांत बांडेबुचे, रामदास शहारे, सतीश ठवकर, बासप्पा फाये, जितेंद्र हलमारे, बंटी मिश्रा, साधना त्रिवेदी, सुर्यकांत इलमे यांनी पुरूषोत्तम चौधरी यांचे अभिनंदन केले. वेळाधिकारी म्हणून नरेश आंबिलकर, बासप्पा फाये यांनी काम पाहिले या विश्वविक्रमासाठी पंच म्हणून प्रकाश सिंग, चंद्रमोनह सिंह यांनी मोलाची कामगिरी बजावली. यशस्वितेसाठी उत्तम चौधरी, अशोक चौधरी, दिनेश भुरे, उमेश ठाकरे, महेश सिसोदिया, संजय धकाते, संदीप सार्वे, वासू राऊत, अमित गायधने, श्री बहिरंगेश्वर व्यायामशाळेच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Purushottam's world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.