शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालणाऱ्या ६२० नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रीसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

ठळक मुद्दे९५ हजारांचा दंड वसूल : मंगल कार्यालये, हॉटेल्स, बार यांचीही तपासणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीकडे कोरुना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येते. हाच दृष्टीकोन समोर ठेवून स्थानिक प्रशासनाच्या पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईत विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या शिवाय मंगल कार्यालय लॉन हॉटेल बाळ व वाईन शॉप व अन्य आस्थापनांमध्येही तपासणी करण्यात आली.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला टेंशन देणारी ठरली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी त्रीसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे. मात्र सांगूनही नियमांना तिलांजली देण्याचा प्रकारही सर्रास सुरू आहे. मास्क न घालता व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता नियमांना बगल देत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याचे उद्दिष्ट समोर ठेवून भंडारा शहरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत जिल्हा प्रशासनासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. भंडारा शहरातील मंगल कार्यालये, लॉन, बार, रेस्टॉरंट तसेच इतर आस्थापनांची तपासणी करून त्यांच्यावर दंडात्मक करण्यात कारवाई करण्यात आली.यात १८ दुकानांसह मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. याशिवाय चार बार व रेस्टॉरंटची ही तपासणी करून या सर्वांकडून ते ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या ६२० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ९५ हजार ५५० रुपयांची दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी मीनल करणवाल यांच्यासह भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरपालिकेचे कर्मचारी प्रशांत गणवीर, मिथुन मेश्राम, संग्राम कटकवार, दादी मिश्रा, राहुल देशमुख यासह अन्य कर्मचारी सहभागी आहेत.

नागरिकांनो सावधान जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना नागरिक नियमांना तिलांजली देत आहेत. यामुळेच प्रशासनाला कडक कारवाई करण्यावरही जोर द्यावा लागत आहे. परिणामी नागरिकांनो सावधान. नियम तुमच्या हितासाठीच आहेत असे बोलण्याची नामुष्कीही ओढवली आहे. आता नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या