शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

जनसंपर्क, उद्योग, रोजगार आदी मुद्दे ठरले प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 17:21 IST

Bhandara : शेड्युल कास्टची मते काँग्रेसच्या पत्थ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तब्बल २५ वर्षांनंतर मुसंडी मारत विजयी मिळविला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांचा ३४ हजार मतांनी पराभव केला. मेंढे यांच्या पराभवानंतर त्यांच्या पराभवाची नेमकी कारणे काय याची चर्चा होऊ लागली आहे, तर खा. सुनील मेंढे यांचा मागील पाच वर्षांत मतदारसंघात असलेला जनसंपर्काचा अभाव, मतदारांमध्ये असलेली नाराजी, उद्योग व रोजगाराचा अभाव, रखडलेले सिंचन प्रकल्प आणि संविधान धोक्यात आल्याचा मुद्दा या निवडणुकीत प्रभावी ठरला. हेच मुद्दे भाजप उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरले.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिंदे सेना यांनी महायुती करून ही निवडणूक लढविली. या मतदारसंघातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयासाठी भरपूर मेहनत घेतली, तर खा. प्रफुल्ल पटेल यांनी मतदारसंघात तळ ठोकून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. पण, याचा फारसा प्रभाव झाला नाही, तर महायुतीचे समीकरण यात सहभागी घटक पक्षांनाच पचनी पडले नाही. त्याचा परिणामसुद्धा प्रत्यक्ष मतदानादरम्यान दिसून आला, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन स्वतः करून सर्व सूत्रे स्वतःकडे ठेवली. प्रचारांपासून ते सभांचे नियोजन त्यांनीच केले, तर शेड्युल कास्ट मतांचा काँग्रेसकडे असलेला कौल महत्पूर्ण ठरला.

मतदारसंघाचा इतिहास कायममागील २५ वर्षांचा या मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास या मतदारसंघातून मतदारांनी सलग दुसऱ्यांदा कोणत्याच उमेदवाराला संधी दिली नाही.प्रफुल्ल पटेल, केशवराव पारधी वगळता यांचा अपवाद वगळता या मतदारसंघातून सलग संधी कुणालाही मिळाली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदारसंघ गृहक्षेत्र असून, त्यांची या मतदारसंघावर बऱ्यापैकी पकड आहे. ती अद्यापही कायम असल्याचे या मतदारसंघातील निकालावरून सिद्ध झाले.

हे मुद्दे ठरले भारी१) भाजपचे खा. सुनील मेंढे यांना मतदारसंघात नाराजी असताना दुसऱ्यांदा दिलेली संधी, पाच वर्षांत न झालेली विकासकामे. २) ही निवडणूक महायुती करून लढविण्यात आली. पण, हे समीकरण महायुतीत सहभागी घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे मतदानादरम्यान प्रभाव दिसला. ३) शेड्युल कास्टची गठ्ठा मते काँग्रेसच्या पत्त्यावर पडली. काँग्रेसने निवडणुकीत चुका टाळत केलेले सूक्ष्म नियोजन है मुद्दे मुद्दे भारी ठरले.

हे मुद्दे ठरले फ्लॉप

१) विकासाचा मुद्दा : या निवडणुकीत भाजप उमेदवाराने विकास आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना यावर फोकस करीत मते मागितली. पण, मतदारांनी हे दोन्ही मुद्दे नाकारले.२)मोदींभोवती निवडणूक केंद्रित: या मतदारसंघातील उमेदवार भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्याबद्दलची असलेली नाराजी ओळखत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतांचा जोगावा मागितला. पण, त्यालादेखील मतदारांनी पूर्णपणे नाकारले.3) केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकास योजना यावर भाजपने निवडणुकीत लक्ष केंद्रित केले, पण हे मुद्दे निवडणुकीत पूर्णपणे गौण ठरले.४) पदाधिकारी कार्यकर्त्यांची ४ बांधणी करण्यात सुनील मेंढे यांना आलेले अपयश व जनसंपर्काचा अभाव 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदिया