जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST2021-06-06T05:00:00+5:302021-06-06T05:00:17+5:30
शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा कायदा करा, सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : किसान कामगार विरोधी मोदी सरकारने तीन काळे शेतकी कायदे मंजूर करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता, त्याला शनिवार रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ, तसेच तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याच्या व इतर मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार भंडारा येथे देशव्यापी चेतावणी दिन पाळण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व किसान सभेचे सचिव माधवराव बांते यांनी केले.
शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा कायदा करा, सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे. खमारी बुट्टी (ता. भंडारा) येथील पूर पीडित गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांची घरे पडली, त्यांना ९५ हजारांचे आर्थिक सहाय्य, अतिक्रमित घरकूलधारकांची घरे नियमानुकूल करून मालकी पट्टे देण्यात यावे. गणेश चिचामे यांना महसूल विभागाच्या चुकीमुळे वन हक्क कायद्याच्या अंतर्गत पट्ट्यापासून वंचित करण्यात आले. त्यांना मालकी पट्टे देण्यात यावे. नंदकिशोर रामटेके व इतर प्रलंबित जबरान जोतदारांना मालकी पट्टे देण्यात यावे. महादेव आंबाघरे सुरेवाडा पुनर्वसन यांना मंजूर भूखंड देण्यात यावे. तसेच ग्रामसेवक कॉलनी भंडारा येथील उर्वरित २७ प्रकल्पग्रस्तांना मोबदला व भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.
ठाणेदारांना निवेदन
विविध मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी ठाणेदारांना निवेदन करण्यात आले. शिष्टमंडळात हिवराज उके, माधवराव बांते सदानंद इलमे, महानंदा गजभिये, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, रत्नाकर मारवाडेे, गणेश चिचामे, विलास केजकर, महादेव ताराचंद आंबाघरे, हरिदास जांगडे, गिरधारी मेश्राम, सुनील बोरकर आदींचा समावेश होता.