शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार तोफा थंडावल्या; मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर उमेदवारांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 05:00 IST

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे मागास प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ३८ जागांसाठी १९८ उमेदवार रिंगणात असून मंगळवार १८ जानेवारी रोजी मतदान होत आहे. गत सात दिवसांपासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी  रविवारी सायंकाळी संपली असून आता उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. तसेच या जागा सर्वसाधारण करुन निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे मागास प्रवर्गातील जिल्हा परिषदेच्या १३ गटातील आणि पंचायत समितीच्या २५ गणातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता ही निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या २५ जागांसाठी १३१ उमेदवार रिंगणात आहेत. ३८ जागांसाठी ही निवडणूक होत असून १९८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १८ जानेवारी रोजी होत आहे. तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहोरा, गर्रा या तीन गटांसाठी १३ उमेदवार, मोहाडी तालुक्यातील कांद्री, डोंगरगाव, वरठी गटांमध्ये १५ उमेदवार, लाखनी तालुक्यातील लाखोरी, मुरमाडी, सावरी, केसलवाडा वाघ आणि मुरमाडी तुपसर या चार गटांसाठी २२ उमेदवार, भंडारा तालुक्यातील एकमेव सिल्ली गटात सहा उमेदवार तर पवनी तालुक्यातील ब्रम्ही व भुयार गटात ११ उमेदवार रिंगणात आहेत. गत सात दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. मात्र कोरोना संसर्गामुळे उमेदवारांना प्रचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रविवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असला तरी उमेदवारांना रॅली काढताना अडचणींचा सामना करावा लागला. आता एक दिवस उमेदवारांच्या हाती असून विजयासाठी प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे सुरु केले आहे.  सर्वांच्या नजरा आता मतमोजणीच्या दिवसाकडे लागल्या आहेत.

१९ जानेवारीला एकत्र मतमोजणी- दोन टप्प्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १९ जानेवारी रोजी होत आहे. मतमोजणीसाठी निवडणुक यंत्रणा सज्ज झाली असून सातही तालुकास्थळी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  

उमेदवारांसाठी सोमवारची रात्र महत्वाची - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी सोमवारची रात्र महत्वाची ठरणार आहे. १८ जानेवारी रोजी मतदान होत असल्याने सोमवारी रात्रीपर्यंत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राहणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद