पीक पद्धत बदलातून कमविला नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:54 IST2018-06-14T23:54:28+5:302018-06-14T23:54:28+5:30
तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.

पीक पद्धत बदलातून कमविला नफा
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे.
खोब्रागडे यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे शेतीत पारंपरिक पद्धतीने धान पिकांची लागवट करीत असत मात्र धन पिकात लागवतीचा खर्चही कधीकधी निघत नव्हता त्यामुळे खोब्रागडे यांनी धान पिकात बदल करत उसाची शेती केली.
या उसाच्या शेतीत त्यांना धान शेतीपेक्षा चांगला नफाही मिळाला मात्र खोब्रागडे हे समाधानीं नव्हते त्यामुळे त्यांनी याच शेतीत काही वेगळा करू शकतो काय याचा विचार केलं,व इंटरनेटच्या र्नेटच्या माध्यमातून नवनवीन पिके लावण्याची माहिती घेतली. खोब्रागडे यांनी रक्त चंदनाची झाडे लावण्याचे ठरविले. त्यांनी एक एकर शेतीमध्ये २८० रक्त चंदनाची झाडे लागवड केली असून हे झाडे मोठे होण्याकरिता १५ वषार्चा कालावधी लागतो. तोपर्यंत यांच्या रिकाम्या जागी काही तरी पीक लागवड करायचे ठरविले. शेवग्याच्या शेंगाची लागवङ केली. शेवग्याच्या शेंगाची बियाणे हि बीड येथून खरेदी करून आणली व १०-१० च्या अंतरावर शेवग्याची बियाणांची लागवड केली. सहा महिन्यांच्या कालावधीत या झाडांना शेवग्याच्या शेंगा लागल्या असून शेवग्याचे झाडे लावण्याकरिता फक्त १० हजार रुपये खर्च आला आहे. या एक एकर शेतीमध्ये एक लाखाचा शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळत आहे. रक्त चंदनाच्या झाडांची आजघडीला एक झाडाची किंमत ही एक लाख रुपये आहे. येत्या काही वर्षात खोब्रागडे यांना दोन कोटीच्या वर उत्पन्न मिळू शकते. तर त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी दोन एकर शेतीमध्ये उसाची लागवड केली आह. दोन एकर शेतीला ५० हजार रुपये खर्च आला असून दोन लाखाचा उत्पन्न होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. , एकंदरीतच खोब्रागडे यांना तीन एकर शेतीत शेवगा व उसाला ६० हजार रुपये खर्च आला असून तीन लाख रुपये उत्पन्न होणार आहे. ६० हजार खर्च वजा केला असता दोन लाख चाळीस हजार रुपये शुद्ध नफा खोब्रागडे यांना मिळणार आहे. खोब्रागडे यांच्या शेतावर काही शेतकरी भेटी देत असून इतरही शेतकरी आपल्या शेतावर या पद्धतीची शेती लागवड करणार असल्याचे सांगत आहे, शासनाची कोणतीच मदत नसतांनी शेतकºयांनी संशोधन करुन आर्थिक प्रगती करीत आहेत किमान कृषि विभागाने बांधावर जावून मार्गदर्शन करण्याची गरज आहे.